दोन छाप्यांत, पाच हजाराची दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:27 IST2021-08-20T04:27:41+5:302021-08-20T04:27:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कळंबा परिसरात दोन ठिकाणी बेकायदेशीर दारु बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी छापे टाकून दोघांवर कारवाई केली. या ...

In two raids, five thousand liquor seized | दोन छाप्यांत, पाच हजाराची दारु जप्त

दोन छाप्यांत, पाच हजाराची दारु जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कळंबा परिसरात दोन ठिकाणी बेकायदेशीर दारु बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी छापे टाकून दोघांवर कारवाई केली. या छाप्यात करवीर पोलिसांनी सुमारे पाच हजार रुपये किमतीची दारु व साहित्य जप्त केले. याप्रकरणी कळंबा कारागृहानजीक केलेल्या कारवाईत महमद युसूफ मणेर (वय ५०, रा. मातंग वसाहत, कळंबा, ता. करवीर) याच्याकडील ३,१४० रुपये किमतीची दारु जप्त केली. कात्यायणी कॉम्प्लेक्स परिसरात घरातील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून पोलिसांनी प्रदीप प्रेमनाथ बाटुंगे (वय ३२, रा. नाईक गल्ली, कात्यायणी कॉम्प्लेक्स, कळंबा) याच्यावर गुन्हा नोंदवला. त्याच्या ताब्यातून रोख रकमेसह दारु असा सुमारे २,०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

फुलेवाडीत तरुणावर हल्ला

कोल्हापूर : फोन करुन बोलावून घेत शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करण्याचा प्रकार घडला. ही घटना फुलेवाडी दत्त मंदिरनजीक घडली. या हल्ल्यात अनिकेत युवराज पाटील (वय २३, रा. फुलेवाडी दुसरा स्टॉप) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ऋषिकेश सूर्यवंशी उर्फ संभा डाकू (रा. फुलेवाडी पाचवा स्टॉप, कोल्हापूर), निरंजन उर्फ गुरु (रा. फुलेवाडी चौथा स्टॉप) यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दुचाकीची चोरी

कोल्हापूर : शाहूनगर, परिते (ता. करवीर) येथे भोगावती हायस्कूलच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी अज्ञाताने बनावट चावीचा वापर करुन अगर लॉक तोडून चोरुन नेली. याबाबत दुचाकीमालक संभाजी नामदेव पाटील (रा. म्हालसवडे, ता. करवीर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दिली आहे.

Web Title: In two raids, five thousand liquor seized