शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

कळंबा कारागृहातील कोरोनाबाधीत दोघा कैद्यांचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 12:08 IST

CoronaVIrus In Kolhapur Jail : कोरोना संसर्गाने बाधीत झालेल्या कळंबा कारागृहातील दोघा कैद्यांनी कैद्यांवर उपचारासाठी खास तयार केलेल्या कोवीड केंद्रातून शुक्रवारी मध्यरात्री धुम ठोकली.

ठळक मुद्देकळंबा कारागृहातील कोरोनाबाधीत दोघा कैद्यांचे पलायनघटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात

कोल्हापूर : कोरोना संसर्गाने बाधीत झालेल्या कळंबा कारागृहातील दोघा कैद्यांनी कैद्यांवर उपचारासाठी खास तयार केलेल्या कोवीड केंद्रातून शुक्रवारी मध्यरात्री धुम ठोकली.

पलायन केलेल्यामध्ये खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला प्रतिक सुहास सरनाईक (रा. देवणे गल्ली, कोल्हापूर) व दरोड्यातील गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला गुंडाजी तानाजी नंदिदवाले (रा. देवणे गल्ली, कोल्हापूर ) या दोघांचा समावेश आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे.या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे खास कैद्यांकरीता तयार केलेल्या आयटीआय वसतीगृहातील कोवीड सेंटर मध्ये उपचार सुरु होते. शुक्रवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास या दोघांनी खिडकीचे गज कापून पलायन केले. दोघे पळून जाताना अन्य कैद्यांनी आरडाओरड केली.

बंदोबस्तावरील पोलीसांनीही विजेरीचा प्रकाश झोत टाकून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते त्यांच्या हाती लागले नाहीत. जेल पोलिसांच्या डोळ्यासमोर त्या दोघांनी धुम ठोकली. शुक्रवारी सकाळपासून जुना राजवाडा पोलिसांचे एक पथक या दोघांच्या मागावर सोडण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjailतुरुंगkolhapurकोल्हापूर