चौघांवर चाकू हल्लाप्रकरणी आणखी दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:24 IST2021-05-18T04:24:41+5:302021-05-18T04:24:41+5:30
कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोडवर एच. पी. पेट्रोल पंपासमोर रस्त्यावर चौघांना चाकूने भोसकल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी आणखी दोघांना ...

चौघांवर चाकू हल्लाप्रकरणी आणखी दोघे अटकेत
कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोडवर एच. पी. पेट्रोल पंपासमोर रस्त्यावर चौघांना चाकूने भोसकल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी आणखी दोघांना अटक केली. तलाह अस्लम शेख (वय २२, रा. आर. के. नगर, मगदूम कॉलनी), सुय्याम उमर डांगे (वय २५, रा. रविवार पेठ, लक्ष्मीपुरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर गुन्ह्यात वापरलेला चाकू व एक दुचाकीही जप्त केली आहे. त्यामुळे याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. अद्याप फरार चौघांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फुलेवाडी रिंग रोडवर शनिवारी रात्री उशिरा काही युवक मद्यप्राशन करत थांबले असताना किरकोळ कारणावरुन एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. यावेळी शिवीगाळ का केली, असा जाब विचारणाऱ्या साद रफीक बागवान (वय २३), राहीब रफिक बागवान, आफताब बालीचंद नायकवडी, राज अख्तर मुजावर (सर्व रा. बिडी कामगार चाळ, साने गुरुजी वसाहत परिसर) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन चाकूने भोसकून गंभीर जखमी करण्यात आले होते. याप्रकरणी एकूण आठजणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी सराईत गुन्हेगार सद्दाम सरदार कुंडले (वय २८, रा. सानेगुरुजी वसाहत), स्वप्नील रंगराव कुरणे (२९, रा. चिंतामणी पार्क, फुलेवाडी रिंगरोड) यांना अटक केली. त्यांना सोमवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता, दि. १९ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान, सोमवारी सायंकाळी पोलिसांनी तलाह शेख, सुय्याम डांगे या दोघांना अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेला चाकू व दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी अद्याप शाहरुख शिकलगार, आरबाज बागवान, जुनेर बारस्कर व मार्शल (पूर्ण नाव नाही) हे चौघे फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
फोटो नं. १७०५२०२१-कोल-तलाह शेख (आरोपी)
फोटो नं. १७०५२०२१-कोल-सुय्याम डांगे (आरोपी)
===Photopath===
170521\17kol_11_17052021_5.jpg~170521\17kol_12_17052021_5.jpg
===Caption===
फोटो नं. १७०५२०२१-कोल-तलाह शेख (आरोपी)फोटो नं. १७०५२०२१-कोल-सुय्याम डांगे (आरोपी)~फोटो नं. १७०५२०२१-कोल-तलाह शेख (आरोपी)फोटो नं. १७०५२०२१-कोल-सुय्याम डांगे (आरोपी)