अहमदनगरातील चोरट्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:10 IST2021-02-05T07:10:03+5:302021-02-05T07:10:03+5:30
कोल्हापूर : गर्दीचा फायदा घेऊन फुलेवाडी रिंग रोडवरील दोघांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन चोरल्याप्रकरणी अटकेतील सराईत चोरट्याकडून पोलिसांनी चोरीचे एक ...

अहमदनगरातील चोरट्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
कोल्हापूर : गर्दीचा फायदा घेऊन फुलेवाडी रिंग रोडवरील दोघांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन चोरल्याप्रकरणी अटकेतील सराईत चोरट्याकडून पोलिसांनी चोरीचे एक लाख ९० हजारांचे दागिने हस्तगत केले. नेवीन संजय माने (वय २३, रा. अमोलनगर, भिंगार माधवबाग, जि. अहमदनगर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्याने हे दागिने अहमदनगरातील घरात लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी दिली.
फुलेवाडी रिंग रोडवर टायगर ग्रुपच्या नवीन शाखेचे उद्घाटन कार्यक्रमावेळी चोरट्याने आकाश पाटील (२३, रा. राजोपाध्येनगर) व योगेश पाटील (रा. कुर्डू, ता. करवीर) यांच्या एकूण ३८ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चेन हिसकावून पोबारा केला होता. ही चोरीची घटना दि. ११ जानेवारी रोजी घडली होती.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी एका गुन्ह्यात नेवीन मानेला अटक केली होती. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनीही त्याला दि. २८ जानेवारी रोजी अटक करून सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. चौकशीत त्याने हे दागिने अहमदनगरातील घरात ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी ते दागिने ताब्यात घेतले.
संशयितावर रायगडसह इतर जिल्ह्यांतही गुन्हे
अटक केलेला संशयित चोरटा नेवीन माने याच्यावर रायगड जिल्ह्यातील पनवेल, नवी मुंबई येथील कळंबोली, बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा व देऊळगाव येथे गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या केल्याचे तसेच अहमदनगर जिल्ह्यात कोतवाली व शेगांव येथे हत्यार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत.
फोटो नं. ०१०२२०२१-कोल-नेवीन माने (आरोपी)
फोटो नं. ०१०२२०२१-कोल-चोरी
ओळ : जप्त केलेले चोरीचे दागिने.