शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा कारागृहात तयार होत आहेत नवरात्रौत्सवासाठी दोन लाख लाडू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 14:18 IST

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवासाठी कळंबा कारागृहातर्फे दोन लाख लाडू तयार करण्यात येणार आहेत; त्यासाठी आत्तापासूनच कारागृह प्रशासनाची तयारी सुरू झाली असून, हे काम करण्यासाठी कैद्यांची संख्या वाढविण्यात आली आहे, अशी माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.

ठळक मुद्देकळंबा कारागृहात तयार होत आहेत दोन लाख लाडू करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाची तयारी सुरू

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवासाठी कळंबा कारागृहातर्फे दोन लाख लाडू तयार करण्यात येणार आहेत; त्यासाठी आत्तापासूनच कारागृह प्रशासनाची तयारी सुरू झाली असून, हे काम करण्यासाठी कैद्यांची संख्या वाढविण्यात आली आहे, अशी माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.येत्या रविवारी (दि. २९)पासून नवरात्रौत्सवास प्रारंभ होत आहे. या निमित्त देवस्थान समिती व श्रीपूजकांची त्यांच्या पातळीवर तयारी सुरू आहे. दुसरीकडे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लाडू प्रसाद पुरविणाऱ्या कळंबा कारागृहातही उत्सवासाठीची लगबग सुरू आहे. इतरवेळीपेक्षा उत्सवकाळात लाडूंची मागणी जास्त असते, गतवर्षी उत्सवकाळात पाऊस होता, तरीदेखील एक लाख ६० हजार लाडूंची विक्री झाली होती.यंदा पावसाचा जोर ओसरला आहे, त्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा परस्थ भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या शक्यतेचा विचार करून कळंबा कारागृह प्रशासनाकडून दोन लाख लाडू बनविण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.

देवस्थान समितीकडून रोज १0 ते १५ हजार लाडूंची आॅर्डर येते; त्यामुळे सध्या लाडूसाठीच्या कळ्या पाडण्याचे काम सुरू आहे; त्यासाठी ४० महिला कैदी व ६० पुरूष कैदी काम करत आहेत. सध्या सकाळी आठ ते दुपारी चार या एका शिफ्टमध्ये हे काम सुरू आहे. उत्सवकाळात मात्र दिवसरात्रीच्या शिफ्टमध्ये हे काम चालेल. महिला दिवसपाळीत, तर पुरूष रात्रपाळीसाठी काम करतील. 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरjailतुरुंग