दोन लाखांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:20 IST2021-05-03T04:20:02+5:302021-05-03T04:20:02+5:30
कोल्हापूर : व्यवसायात वृद्धी होईल असे आमिष दाखवून सोन्याच्या दागिने, रोकडसह सुमारे दोन लाखाला गंडा घालणाऱ्यावर जुना राजवाडा पोलीस ...

दोन लाखांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा
कोल्हापूर : व्यवसायात वृद्धी होईल असे आमिष दाखवून सोन्याच्या दागिने, रोकडसह सुमारे दोन लाखाला गंडा घालणाऱ्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आकाश वसंत पाटील (रा. कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील दत्तात्रय महादेव कुंभार त्यांच्या व्हाॅट्सॲपवर कोल्हापुरातील संशयित आकाश पाटील याने वारंवार संदेश पाठवून ओळख वाढवली. यातून त्याने त्यांचा विश्वास संपादन करून, तुम्हाला व्यवसायात वृद्धी निर्माण करून देतो असे आमिष दाखवले. दि. २७ नोव्हेंबर २००० ते १६ जानेवारी २०२१ या कालावधीत त्यांच्याकडील चार सोन्याच्या बांगड्या आणि ४१ हजार पाचशे रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ९१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन त्याने फसवणूक केली. याप्रकरणी कुंभार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आकाश पाटील याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.