शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या दोघांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 14:57 IST

Police Kolhapur : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील १६२ पोलिसांना उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील पोलीस नाईक सरदार श्रीपती पाटील (कळे पोलीस ठाणे), पोलीस नाईक विश्वजित शांतीनाथ गाडवे (चंदगड पोलीस ठाणे) या दोघांचा समावेश आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या दोघांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढतीउच्च न्यायालयाचा आदेश : राज्यातील १६२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील १६२ पोलिसांना उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील पोलीस नाईक सरदार श्रीपती पाटील (कळे पोलीस ठाणे), पोलीस नाईक विश्वजित शांतीनाथ गाडवे (चंदगड पोलीस ठाणे) या दोघांचा समावेश आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या उपनिरीक्षक पदाच्या विभागीय मर्यादित मुख्य स्पर्धा परीक्षेत १६२ पोलीस कर्मचारी उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत आले होते; पण त्यांना उपनिरीक्षक पदावर प्रत्यक्ष पदोन्नती मिळाली नव्हती. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून न्यायालयात पुनर्याचिका दाखल केल्या होत्या.

उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना उपनिरीक्षक पदावर बढतीचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्याच्या पोलीस महासंचालकांनी कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षकपदाच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत.पदोन्नती मिळालेल्या पोलिसांना नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी रवाना केले आहे. विभागीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांना पदोन्नतीसाठी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागली. न्यायालयाच्या निर्णयाने त्यांना दिलासा मिळाला.

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर