झाडाला कार धडकून दोघे ठार; आडूरमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:51 IST2019-02-04T00:51:35+5:302019-02-04T00:51:55+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील आडूर (ता. करवीर) फाट्याजवळील झाडाला कार धडकून चालकासह दोघे जागीच ठार झाले. रामदास महादेव कांबळे ...

झाडाला कार धडकून दोघे ठार; आडूरमधील घटना
कोल्हापूर : कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील आडूर (ता. करवीर) फाट्याजवळील झाडाला कार धडकून चालकासह दोघे जागीच ठार झाले. रामदास महादेव कांबळे (वय २८ , रा. नंदवाळ, ता. करवीर) व शुभम निवास माळवी (१७, रा. कळे, ता. पन्हाळा) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना रविवारी रात्री घडली. याची नोंद ‘सीपीआर’ पोलीस चौकीत रात्री उशिरा झाली.
रामदास कांबळे व शुभम माळवी हे दोघे रात्री कारमधून कळेकडे निघाले होते. यावेळी आडूर फाट्यावरील झाडावर त्यांची कार जोराने धडकली. यात ते जागीच ठार झाले, तर कारचा चक्काचूर होऊन ती नाल्यात पडली. हा प्रकार समजताच आडूर पोलीसपाटील यांचे पती अभय पोवार हे घटनास्थळी आले. त्यांनी तत्काळ त्यांच्या जीपमधून दोघांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) आणले; पण हे दोघे उपचारापूर्वीच मृत झाले होते. दरम्यान, हा प्रकार समजताच नंदवाळ, कळेतील मृतांचे नातेवाईक ‘सीपीआर’मध्ये आले. त्यांनी तिथे आवारात टाहो फोडला.