हॉटेलमध्ये मारहाणीत दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:25 IST2021-03-16T04:25:51+5:302021-03-16T04:25:51+5:30

कोल्हापूर : हॉटेलमध्ये टेबलवर जेवायला बसण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत काही युवकांनी केलेल्या हल्ल्यात दोघे तरुण जखमी झाले. ही घटना ...

Two injured in beating at hotel | हॉटेलमध्ये मारहाणीत दोघे जखमी

हॉटेलमध्ये मारहाणीत दोघे जखमी

कोल्हापूर : हॉटेलमध्ये टेबलवर जेवायला बसण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत काही युवकांनी केलेल्या हल्ल्यात दोघे तरुण जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री उशिरा मिरजकर तिकटी चौकातील एका हॉटेलमध्ये घडली. यामध्ये दिग्विजय शिवाजी आगलावे (वय २४, रा. मंगेशकरनगर, मंगळवार पेठ) व ऋषभ ढेरे (वय २३, रा. पीटीएमनजीक, मंगळवार पेठ), अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मिरजकर तिकटी चौकातील एका व्यापार संकुलातील हॉटेलमध्ये दिग्विजय आगलावे व त्याचा मित्र ऋषभ ढेरे हे दोघे गेले होते. त्यावेळी ओंकार (पूर्ण नाव नाही) व त्याचे तीन अनोळखी मित्र आले. त्यांची दिग्विजय व ऋषभ यांच्याशी टेबलावर बसण्याच्या कारणावरून किरकोळ वादावादी झाली. त्यावेळी संशयितांनी प्रथम ऋषभला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यावेळी दिग्विजय वाद सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही शिवीगाळ करून त्याच्या डोक्यात पाण्याचे जार घालून त्याला जखमी केले. याबाबत जखमी आगलावे याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ओंकार याच्यासह अज्ञात तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Two injured in beating at hotel