शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी दोनशे शाळांचे ८५ कोटी रुपये थकले, संस्थाचालक अडचणीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 17:17 IST

शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक केले आहे

पोपट पवारकोल्हापूर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत इंग्रजी माध्यमांच्या खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यासाठीचे अनुदान शासनाकडून संबंधित शाळांना दिले जाते; मात्र गेल्या बारा वर्षांपासून जिल्ह्यातील २०० हून अधिक शाळांचे ८५ कोटी रुपये सरकारकडे थकले आहेत. विशेष म्हणजे गेल्या साडेतीन वर्षांपासून एक रुपयाही शाळांना दिला नसल्याने शाळा चालवायच्या कशा, असा सवाल संस्थाचालकांमधून उपस्थित होत आहे. आरटीईतून वंचित, दुर्बल घटकांना माेफत शिक्षणाचा डंका पिटणाऱ्या सरकारने अनुदानाची रक्कम थकवून शाळांची मात्र कोंडी केली आहे.शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक केले आहे. यातून वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. २५ टक्के जागांवर प्रवेश देणाऱ्या शाळांना प्रति विद्यार्थी १७ हजार ६७० रुपये इतके सरकारकडून प्रतिपूर्ती अनुदान दिले जाते. प्रत्येक वर्षी शाळांना हे अनुदान देण्याचा नियम आहे; मात्र हे अनुदान वेळेत कधीच मिळत नसल्याने संस्थाचालकांची अडचण झाली आहे.

काही शाळांची कोटीपर्यत रक्कम थकलीकाेल्हापूर जिल्ह्यात ३२५ शाळांमध्ये यंदा आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात आले आहेत. यातील बहुतांश शाळांची रक्कम २०१२ पासून मिळालेली नाही. काही शाळांची कोटीपर्यंत रक्कम थकली असताना त्यांना केवळ दोन-तीन लाख रुपयेच अनुदान मिळाले आहे. त्यामुळे अशी रक्कम घेऊन आम्ही शाळा चालवायच्या कशा असा सवाल संस्थाचालक करत आहेत. जिल्ह्यातील आरटीई अंतर्गत शाळांना २०२० पासून एक रुपयाचेही अनुदान मिळालेले नाही.

पालकांचा दबावशाळांच्या भौतिक सुविधा, शिक्षकांचे मानधन, या सर्व आर्थिक गोष्टींचाही शाळांना विचार करावा लागतो. सरकार अनुदान देत नसल्याने काही शाळांनी २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यास नकारघंटा दर्शविताच पालक थेट कायद्याची भीती दाखवत आहेत. एकीकडे हक्काचे अनुदान मिळेना तर दुसरीकडे कायद्याची भीती या दुहेरी कात्रीत संस्थाचालक अडकले आहेत.

गेल्या सात ते आठ वर्षांपासून आम्हाला अनुदान मिळालेले नाही. सरकार अनुदान देत नाही म्हणून आम्ही विद्यार्थ्यांचे प्रवेश कधीच अडवत नाही. आमची थकीत रक्कम कोटीपर्यंत गेली आहे; मात्र केवळ दोन-तीन लाख रुपयेच दिले आहेत.अशात आम्ही शाळा कशा चालवायच्या. - नीलराजे बावडेकर, उपाध्यक्ष माईसाहेब बावडेकर प्रशाला कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळा