हातकणंगलेत दोन, तर करवीर डेल्टा प्लसचा एक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:31 IST2021-08-17T04:31:04+5:302021-08-17T04:31:04+5:30

हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील २६ वर्षांच्या युवकाची ७ जुलै २०२१ रोजी कोरोना चाचणी करण्यात आली. तो पॉझिटिव्ह आल्यामुळे ...

Two in Hatkanangle and one in Karveer Delta Plus | हातकणंगलेत दोन, तर करवीर डेल्टा प्लसचा एक रुग्ण

हातकणंगलेत दोन, तर करवीर डेल्टा प्लसचा एक रुग्ण

हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील २६ वर्षांच्या युवकाची ७ जुलै २०२१ रोजी कोरोना चाचणी करण्यात आली. तो पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याची तब्येतही बरी झाली; परंतु पुढच्या सर्वेक्षणामध्ये त्याला डेल्टा प्लसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. याच तालुक्यातील दुर्गवाडीच्या ३८ वर्षाच्या युवकालाही याच विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ३ जुलै रोजी तो कोरोना पॉझिटिव्ह आला होता. करवीर तालुक्यातील निगवे दुमाला १३ वर्षाच्या शाळकरी मुलीला ही लागण झाल्याचा अहवाल रविवारी आला आहे. ती ६ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आली होती.

ज्यांचा अहवाल डेल्टा प्लसचा आलेला आहे त्यांच्या नजिकच्या संपर्कात आलेल्यांचीही पुन्हा तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले.

Web Title: Two in Hatkanangle and one in Karveer Delta Plus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.