दोन पोती गुटखा जप्त

By Admin | Updated: July 31, 2014 23:21 IST2014-07-31T22:41:12+5:302014-07-31T23:21:33+5:30

इचलकरंजीत दोघांना अटक : सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Two granddaughter seized gutka | दोन पोती गुटखा जप्त

दोन पोती गुटखा जप्त

इचलकरंजी : येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गुटख्याची दोन पोती (७९ बॅग) जप्त करून त्याची वाहतूक करणारे दोन टेम्पो पकडले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, दोन्ही टेम्पो व गुटखा असा एकूण सहा लाख २१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमित प्रमोद मिणचे (वय ३०, रा. सम्राट अशोकनगर, इचलकरंजी) व धोंडिराम दादू माने (४२, रा. गांधीनगर, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रात्री गस्त घालताना शहापूर रोडवरील सम्राट अशोकनगर परिसरात दोन टेम्पो (एमएच०९ सीयु ०१०२ व एमएच०९ बीसी २३०९) सह चालक उभे असल्याचे दिसले. दरम्यान, ते दोघेही पोलीस दिसल्यानंतर पळून जाऊ लागले. त्यामुळे संशयावरून पोलिसांनी त्यांना पकडले. तेव्हा त्यांच्याकडे चौकशी केली असता दोन्ही टेम्पोमध्ये आर्यन कंपनीच्या गुटख्यांची पोती असल्याचे सांगितले. पोलिसांनी टेम्पो जप्त करून गावभाग पोलीस ठाण्यात आणले. पोत्यांमध्ये ७९ गुटख्यांच्या बॅगा होत्या. या घटनेची नोंद गावभाग पोलिसांत झाली आहे. ही कारवाई दीपक शेळके, राजू नलवडे, संजय जाधव, विजय तळसकर, संजय फडतारे, अजिंक्य घाटगे, आदींच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)

Web Title: Two granddaughter seized gutka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.