शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दोन कुटुंबाचा एकमेकांवर काठीने हल्ला, बोंद्रेनगरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:26 IST

किरकोळ कारणांवरुन दोन कुटुंबांत काठीने झालेल्या एकमेकांवरील हल्ल्यात सहाजण जखमी झाले. ही घटना फुलेवाडी बोंद्रेनगरात गगनगिरी पार्कमध्ये घडली. याबाबत दोन्हीही कुटुंबीयांनी एकमेकांविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून एकूण सात जणांवर गुन्हा नोंदवला आहे.

ठळक मुद्देदोन कुटुंबाचा एकमेकांवर काठीने हल्ला, बोंद्रेनगरातील घटना सहा जखमी ; पोलिसांत परस्परविरोधी तक्रार

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरुन दोन कुटुंबांत काठीने झालेल्या एकमेकांवरील हल्ल्यात सहाजण जखमी झाले. ही घटना फुलेवाडी बोंद्रेनगरात गगनगिरी पार्कमध्ये घडली. याबाबत दोन्हीही कुटुंबीयांनी एकमेकांविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून एकूण सात जणांवर गुन्हा नोंदवला आहे.याबाबत राजू बाबू बरगे याने दिलेल्या तक्रारीनुसार, सिंधू गावडे हे कोणाला तरी शिव्या देत होते, त्यावेळी मंगल यांनी त्याबाबत त्यांना विचारले असता त्यावेळी चिडून सिंधू गावडे याने मंगलला शिवीगाळ केली. त्याबाबत राजू बरगे यांनी जाब विचारता गावडे व त्याचा भाचा सागर बोडके यांनी राजूसह त्यांचे वडील बाबू बरगे, पत्नी मंगलला काठीने मारहाण करून जखमी केले. याबाबत सिंधु गावडे, सागर बोडके (रा. बोंद्रेनगर) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, सिंधु गावडे याने दिलेल्या तक्रारीवरून राजू बरगे व त्याचे वडील बाबू बरगे, बंडा बोडेकर, पांडूरंग बोडेकर (रा. गगनगिरी पार्क, बोंद्रेनगर) या चौघांनी १५ दिवसांपूर्वी नळाच्या पाण्यावरुन झालेल्या वादातून आपल्या घरात घुसून प्रापंचिक साहित्याचे नुकसान केले.

तसेच आपल्यासह पत्नी सुप्रिया, आत्याचा मुलगा सागर बोडके यांना काठीने, लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिली. याबाबत राजू बरगे, बाबू बरगे, बंडा बोडेकर, पांडुरंग बोडेकर यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस