शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

Kolhapur: ए.एस ट्रेडर्स फस‌वणुकीतील दोन संचालकांना अटक, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 

By उद्धव गोडसे | Updated: August 8, 2023 19:19 IST

एकास नांदेडमधून केली अटक

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणा-या ए.एस ट्रेडर्स कंपनीच्या दोन संचालकांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज, मंगळवारी (दि. ८) अटक केली. बाबासो भूपाल धनगर (वय ३०) आणि बाळासो कृष्णात धनगर (वय ५५, दोघे रा. बहिरेवाडी, ता. पन्हाळा) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. बाबासो याला पोलिसांनी नांदेडमधून अटक केली, तर बाळासो याला बहिरेवाडी येथील घरातून अटक केली.आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून एएस ट्रेडर्स फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास गतिमान झाला असून, काल, सोमवारी दोन संचालकांना अटक केली. नांदेडमधील वजिराबाद पोलिस ठाण्यात जानेवारी २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून नांदेड पोलिस ए.एस. ट्रेडर्सच्या पाच संशयितांच्या मागावर होते. त्यापैकी बाबासो धनगर हा आठवड्यापूर्वी नांदेड पोलिसांच्या हाती लागला.

कोल्हापुरातील गुन्ह्यातही त्याचा सहभाग असल्याने आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. ७) रात्री नांदेड पोलिसांकडून त्याचा ताबा घेतला. मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बहिरेवाडी येथून दुसरा संशयित बाळासो धनगर याला मंगळवारी दुपारी अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाईल.बाबासो हा नांदेडमधील कंपनीचा संचालक आहे, तर बाळासो हा कोल्हापुरातील एएस ट्रेडर्सचा संचालक आहे. गुन्हे दाखल होताच अटक टाळण्यासाठी हे दोघे पळाले होते. अखेर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्या पथकाने दोन्ही संचालकांच्या मुसक्या आवळल्या. दोघांच्या अटकेमुळे गुन्ह्यातील महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस