आचार्य शांतीसागर महाराजांवर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:25 IST2020-12-06T04:25:04+5:302020-12-06T04:25:04+5:30

शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर अध्यासन केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ. विजय ककडे, समितीचे प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, ...

A two-day national seminar on Acharya Shantisagar Maharaj | आचार्य शांतीसागर महाराजांवर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

आचार्य शांतीसागर महाराजांवर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर अध्यासन केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ. विजय ककडे, समितीचे प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, प्रा. डी. ए. पाटील, संजय शेटे, सुरेश रोटे, संदीप पाटील यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत याची घोषणा केली. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या परिषदेत डॉ. डी. ए.पाटील लिखीत शांतीसागर चरित्र व भारती उपाध्ये लिखीत आत्मसंस्कार या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. परिषदेचा समारोप खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

आचार्य शांतीसागर महाराजांनी मार्च १९२० मध्ये बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी येथे परमपुज्य देवेंद्र कीर्ती महाराज यांच्याकडून निग्रंथ मुनिदीक्षा घेतली. त्याला यावर्षी १०० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने शताब्दी समिती स्थापनत्रूरुन देशभर विविध सभा, समारंभ, विधी, विधाणे, चरित्रनिर्मिती, ग्रंथनिर्मिती, यरनाळ येथे समाजोपयोगी प्रकल्प साकारले आहेत. विविध विद्यापीठे, शाळा, कॉलेजीसमध्ये शांतीसागर महाराजांचे जीवनकार्य व्याख्यानांच्या माध्यमातून पोहोचविले जात आहे.

चौकट ०१

८ डिसेंबर : उद्घाटन, नऊ वक्त्यांची भाषणे, काव्यसंमेलन : अध्यक्षस्थान : शाहीर कुंतीनाथ करके

९ डिसेंबर : लठ्ठे फौंडेशन उद्घाटन व समारोप : अध्यक्षस्थान रावसाहेब पाटील

Web Title: A two-day national seminar on Acharya Shantisagar Maharaj