हातकणंगले नगरपंचायतीला दोन कोटीचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:20 IST2021-01-09T04:20:24+5:302021-01-09T04:20:24+5:30
हातकणंगले नगरपंचायतीला मंजुरी मिळाली, तेव्हापासून गेले वर्षभर भरीव निधी मिळाला नव्हता. नगरपंचायत निवडणुकीनंतर कोराेनाचा फैलाव झाला. गेले वर्षभर विकास ...

हातकणंगले नगरपंचायतीला दोन कोटीचा निधी मंजूर
हातकणंगले नगरपंचायतीला मंजुरी मिळाली, तेव्हापासून गेले वर्षभर भरीव निधी मिळाला नव्हता. नगरपंचायत निवडणुकीनंतर कोराेनाचा फैलाव झाला. गेले वर्षभर विकास कामासाठी निधीची गरज होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने तसेच पालकमंत्री व आमदार राजू आवळे काँग्रेसचे असल्याने त्यांनी निधीसाठी शासनदरबारी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे हातकणंगले नगरपंचायतीसाठी नगरोत्थान विभागाकडून ६६ लाख ६६ हजार ६६६ रुपये, दलित वस्ती सुधारणेअंतर्गत एक कोटी पंचवीस लाख रुपये व दलितोत्तरअंतर्गत सात लाख पन्नास हजार रुपये असा सुमारे दोन कोटीचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी प्राप्त होताच त्याचे योग्य नियोजन करून शहरातील रस्ते, गटारी यासह इतर आवश्यक ठिकाणी विकास कामांसाठी निधी वापरला जाणार असल्याचे नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांनी स्पष्ट केले.