शिरोलीत उभारले दोन कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST2021-04-28T04:25:10+5:302021-04-28T04:25:10+5:30
शिरोली : शिरोली डॉक्टर असोसिएशनने उमाभवन आणि मुस्लीम समाजाच्या वतीने मदरसा येथे शिरोलीत कोविड सेंटर सुरू करण्यात ...

शिरोलीत उभारले दोन कोविड सेंटर
शिरोली : शिरोली डॉक्टर असोसिएशनने उमाभवन आणि मुस्लीम समाजाच्या वतीने मदरसा येथे शिरोलीत कोविड सेंटर सुरू करण्यात आले. मदरसा येथील कोविड सेंटरमध्ये १०० बेडची व्यवस्था केली आहे.
शिरोली डॉक्टर असोसिएशनने उमाभवन येथे ५० बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. यामध्ये ३० बेड ऑक्सिजनचे आणि २० बेड विनाऑक्सिजनचे आहेत. कोविड रुग्ण दररोज वाढत आहेत. रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी शिरोलीतील सर्व डॉक्टरांनी एकत्रित येऊन हे कोविड सेंटर सुरू केले आहे. माफक दरात येथे उपचार केले जाणार आहेत, असे डॉक्टर असोसिएशनने अध्यक्ष डॉ योगेश खवरे यांनी सांगितले, तर शिरोली मदरसा येथे मुस्लीम समाजाच्या नूर रसूल फाउंडेशनच्या वतीने १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. यात ४० बेड ऑक्सिजनचे आणि ६० बेड विनाऑक्सिजनचे आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही शिरोली मदरसा येथे मुस्लीम समाजाने कोविड सेंटर सुरू करून रुग्णांना उपचार देऊन बरे केले होते. शिरोलीत एकाच दिवशी दोन कोविड सेंटर सुरू झाल्याने शिरोली परिसरातील, हातकणंगले, इचलकरंजी, वडगाव, कोल्हापूर शहरांतील रुग्णांची सोय होणार आहे.
फोटो: २७ शिरोली कोविड सेंटर
शिरोली डॉक्टर असोसिएशनचे उमाभवन येथे सुरू केलेले कोविड सेंटर.