शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: इचलकरंजी आयुक्तांच्या एका खुर्चीवर दोन आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 11:53 IST

इचलकरंजी : महानगरपालिकेचे आयुक्त पदाच्या खुर्चीवर एकाच वेळी श्रीमती पल्लवी पाटील आणि ओमप्रकाश दिवटे हे दोन आयुक्त बसल्याने प्रशासनाचा ...

इचलकरंजी : महानगरपालिकेचे आयुक्त पदाच्या खुर्चीवर एकाच वेळी श्रीमती पल्लवी पाटील आणि ओमप्रकाश दिवटे हे दोन आयुक्त बसल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला. आयुक्त पाटील यांनी सरकारी वकिलांशी बोलणे झाल्यानंतर त्या परतल्या. मात्र यामुळे खुर्चीचा अजब खेळ पाहण्यास मिळाला.इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी श्रीमती पल्लवी पाटील यांनी ११ जून रोजी सायंकाळी पदभार घेतला होता. दिवटे यांनी या बदली विरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय न्याधिकरण बोर्ड, मुंबई मध्ये धाव घेतली होती. न्यायधिकरणाने दिवटे यांची नियुक्ती कायम ठेवली होती. आपण पदभार सोडला नाही असे पत्रही दिवटे यांनी नगरविकास विभागला दिले होते.आज दिवटे हे आपल्या ऑफिस मध्ये येण्यापूर्वी पाटील या आयुक्तांच्या खुर्चीवर येऊन बसल्या होत्या. त्यानंतर दिवटे आले, त्यांनी न्याधिकरणाने दिलेला निर्णय सांगितला. पाटील यांनी आपल्याला आदेश मिळाला नसल्याचे सांगितले आणि खुर्चीवरून उठण्यास नकार दिला.  न्याधिकरणात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या सोबत पाटील यांना बोलण्यास सांगितले मात्र पाटील यांनी आपल्याला आदेश मिळाला नसल्याचे सांगितले. अखेर पाटील यांनी सरकारी वकील क्रांती गायकवाड यांच्या सोबत बोलल्या. त्या अगोदर दिवटे यांनी बाजूला बसून कामाला सुरुवात केली होती. तसेच व्हीसीला ही अधिकाऱ्यांना घेऊन बैठक चालू केली.दरम्यान पाटील यांचे वकिलांशी बोलणे झाल्यानंतर त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला. आपण जात असल्याचे पाटील यांनी दिवटे यांना सांगितले. त्यानंतर पाटील निघून गेल्या. या सर्व प्रकार महापालिकेचे आयुक्त, अधिकारी कर्मचारी यांच्या समोर घडला. इतक्या मोठ्या पदावर असलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या हा प्रकार घडल्याने त्या पदाची अवहेलना झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीcommissionerआयुक्तTransferबदली