विज्ञान शाखेच्या ‘कट ऑफ’मध्ये दोन टक्क्यांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:25 IST2021-09-26T04:25:39+5:302021-09-26T04:25:39+5:30

कोल्हापूर : दुसऱ्या फेरीत पात्र ठरलेल्या ५ हजार २७८ विद्यार्थ्यांनी मंगळवार (दि.२८) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ...

Two per cent increase in science cut-offs | विज्ञान शाखेच्या ‘कट ऑफ’मध्ये दोन टक्क्यांची वाढ

विज्ञान शाखेच्या ‘कट ऑफ’मध्ये दोन टक्क्यांची वाढ

कोल्हापूर : दुसऱ्या फेरीत पात्र ठरलेल्या ५ हजार २७८ विद्यार्थ्यांनी मंगळवार (दि.२८) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवड झालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चत करावा. अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत विज्ञान शाखेच्या कटऑफमध्ये एक ते दोन टक्क्यांनी, तर वाणिज्य शाखेत सरासरी ०.४० टक्केनी वाढ व २३.८ टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे. अशी माहिती सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी शनिवारी दिली.

गेल्यावर्षीपेक्षा यंदा कटऑफ लिस्ट आकडा कमी झाला असून, विज्ञान, वाणिज्य, कला शाखेकडेही विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे अधिक कल दाखविला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शहरातील महाविद्यालयांना दुय्यम स्थान दिले आहे. दुसऱ्या फेरीतच जागा शिल्लक राहिल्याने हीच फेरी अंतिम ठरली. पहिल्या फेरीत त्याची प्रचिती आल्यानंतर दुसऱ्या फेरीतही तीच स्थिती राहिली. त्यामुळे ॲलाॅट झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. त्यानंतर कोणताही प्रवेश अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्यावतीने केला जाणार नाही. दुसऱ्या फेरीत ९ हजार ३८३ पैकी ५ हजार २७८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तिन्ही शाखांत एकूण ४ हजार १०५ जागा रिक्त राहिल्या आहेत. यादीत नाव समाविष्ट झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. त्यानंतर कोणताही प्रवेश अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्यावतीने केला जाणार नाही. दुसऱ्या फेरीत ९ हजार ३८३ पैकी ५ हजार २७८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तिन्ही शाखांत एकूण ४ हजार १०५ जागा रिक्त राहिल्या आहेत.

Web Title: Two per cent increase in science cut-offs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.