दोन मोटारींची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST2021-06-20T04:16:55+5:302021-06-20T04:16:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील पोलीस अधीक्षक कार्यालय ते पोस्ट ऑफिस चौकदरम्यान रस्त्यावर दोन भरधाव मोटारींची समोरासमोर धडक ...

दोन मोटारींची धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील पोलीस अधीक्षक कार्यालय ते पोस्ट ऑफिस चौकदरम्यान रस्त्यावर दोन भरधाव मोटारींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तीन लाखांचे नुकसान झाले. दीपक नंदकुमार शिंदे (वय ३५, रा. गडकरी कॉलनी, फुलेवाडी, रिंगरोड) हे आपल्या पत्नी, मुलांसह घरी जात असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने त्यांच्या मोटारीला धडक दिली. अपघातात शिंदे याचा मुलगा किरकोळ जखमी झाला. याप्रकरणी शिंदे यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात मोटारचालकावर तक्रार दिली.
दुचाकीच्या धडकेत तरुणी जखमी
कोल्हापूर : पायी निघालेल्या तरुणीला भरधाव दुचाकीस्वाराने ठोकरल्याने त्या जखमी झाल्या. दीपाली तानाजी मोरे (वय २२, सध्या रा. सनराईज हॉस्पिटल लेडीज होस्टेल, शिवाजी पार्क. मूळ गाव- तानाग (ता. मिरज, जि. सांगली) असे जखमीचे नाव आहे. दीपाली ह्या मैत्रिणीसोबत राजीव गांधी पुतळा ते दाभोळकर चौक पायी जात असताना पाठीमागून अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना धडक देऊन वर्दी न देताच निघून गेला. त्यांनी याबाबत शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.