शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रेकी करून दुचाकी चोरायचे, दागिने हिसकावयाचे; कोल्हापूर पोलिसांनी दोघा सख्ख्या भावांना कर्नाटकात केली अटक

By उद्धव गोडसे | Updated: September 25, 2023 16:18 IST

१२ गुन्ह्यांची उकल, तीन लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : रेकी करून दुचाकी चोरी आणि महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणा-या दोन सख्ख्या भावांना शाहूपुरी पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली. अशरफअली शेरअली नगारजी (वय १९) आणि सैफअली शेरअली नगारजी (वय २३, दोघे रा. निपाणी, जि. बेळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.या दोघांच्या चौकशीत १२ गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यांच्याकडून चोरीतील पाच दुचाकी आणि दोन लाखांचे दागिने हस्तगत केल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी सोमवारी (दि. २५) पत्रकार परिषदेत दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, निपाणी येथील अशरफअली आणि सैफअली हे दोघे सीमाभागातील सराईत चोरट्यांच्या टोळीत सक्रीय आहेत. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी सदर बाजार येथे एक खोली भाड्याने घेतली. त्यानंतर अन्य दोन साथीदारांसह रेकी करून ते दुचाकी चोरी आणि महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचे प्रकार करीत होते. गुन्हे केल्यानंतर चारही संशयित खोली सोडून कर्नाटकात गेले होते. यातील दोघांना कर्नाटकातील रायलपाडू (जि. कोलार) आणि हनूर (जि. चामराजनगर) पोलिस ठाण्यात दैनंदिन हजेरी लावणे बंधनकारक असल्याची माहिती मिळताच, शाहूपुरी पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी पत्रव्यवहार करून दोघांना ताब्यात घेतले.अधिक चौकशीत नगारजी बंधूंनी आणखी दोन साथीदारांना सोबत घेऊन १२ गुन्हे केल्याची कबुली दिली. यात दुचाकी चोरीचे पाच गुन्हे, तर जबरी चोरीच्या सात गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी संशयितांकडून एक लाख ३० हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी आणि जबरी चोरीतील चार मंगळसूत्र, एक बोरमाळ, एक मोहनमाळ आणि सोन्याचा सर असा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, सहायक फौजदार संदीप जाधव, संजय जाधव, मिलिंद बांगर, लखनसिंह पाटील, शुभम संकपाळ, बाबासाहेब ढाकणे, रवी आंबेकर, विकास चौगुले, महेश पाटील, वीरेंद्र वडेर, आदींनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस