पाचगावात किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:14 IST2021-02-19T04:14:42+5:302021-02-19T04:14:42+5:30

कोल्हापूर : फार्म हाऊसच्या गेटसमोर लघुशंका करू नका, असे सांगणाऱ्या युवकासह त्याच्या भावास अज्ञात तिघा जणांनी मारहाण केली. याबाबत ...

Two beaten for minor reasons in Pachgaon | पाचगावात किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण

पाचगावात किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण

कोल्हापूर : फार्म हाऊसच्या गेटसमोर लघुशंका करू नका, असे सांगणाऱ्या युवकासह त्याच्या भावास अज्ञात तिघा जणांनी मारहाण केली. याबाबत नीलेश महादेव घोरपडे (वय ३१, रा. समर्थ कॉलनी, संभाजीनगर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात गेंड्या नावाच्या अज्ञात इसमासह दोघांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

पोलिसांनी दिलेली माहिती माहिती अशी, फिर्यादी घोरपडे यांचे पाचगाव (ता. करवीर) येथे लक्ष्मी निवास फार्म हाऊस आहे. मंगळवारी (दि.१६) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास गेंडा ऊर्फ डॉन नावाच्या इसमाने फार्म हाऊसच्या गेटसमोर लघुशंका केली, यावर फिर्यादीने त्यांना इथे असे कृत्य करू नका, पुढे जा, असे सांगितले. मी कोण आहे माहीत आहे का? मी डॉन आहे. गेंडा बाई म्हणतात मला, असे म्हणत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्यासोबत असलेल्या दोन अन्य अनोळखी इसमांनीही मारहाण केली. फिर्यादीसोबत असलेला त्याचा भाऊ निशाण यालादेखील या तिघांनी मारहाण केली. जाताना चारचाकीच्या काचाही फोडल्या. याचा तपास पोलीस नाईक गुरव करीत आहेत.

Web Title: Two beaten for minor reasons in Pachgaon