हॉकी स्टेडियम येथे तलवारहल्लाप्रकरणी दोघे अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:25 IST2021-04-02T04:25:09+5:302021-04-02T04:25:09+5:30

कोल्हापूर : हॉकी स्टेडियम चौकातील तलवार व चाकूहल्लाप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी गुरुवारी रात्री तिघांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी राजेंद्रनगरातील ...

Two arrested in sword attack case at hockey stadium | हॉकी स्टेडियम येथे तलवारहल्लाप्रकरणी दोघे अटक

हॉकी स्टेडियम येथे तलवारहल्लाप्रकरणी दोघे अटक

कोल्हापूर : हॉकी स्टेडियम चौकातील तलवार व चाकूहल्लाप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी गुरुवारी रात्री तिघांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी राजेंद्रनगरातील दोघा हल्लेखोरांना अटक केली. पिंटू राजू लोंढे (वय २६), मारुती बापू पाटोळे (२६, दोघेही रा. राजेंद्रनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर सोन्या मांगले (रा. राजेंद्रनगर) हा अद्याप पसार आहे.

बुधवारी रात्री झालेल्या तलवार व चाकूहल्ल्यात उदय मनोहर यादव (४६, रा. जासूद गल्ली, मंगळवार पेठ), रवी तुपारी (३४), सागर पाडळकर (४५, दोघेही रा. निर्माण चौक, कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ध्यानचंद हॉकी स्टेडियम चौकात खाऊ गल्लीत रवी तुपारी याचा रोल खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे. तेथेच उदय यादव यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. बुधवारी रात्री लहान मुलांचा वाद सुरू असताना तेथे उदय व रवी हे दोघे वाद सोडविण्यासाठी गेले होते. त्यावेळी राजेंद्रनगरमधील काही तरुणांनी तलवार व चाकूहल्ला करून उदय यादव, रवी तुपारे व सागर पाडळकर या तिघांना जखमी केले. त्यांना उपचारासाठी प्रथम सीपीआर व नंतर खासगी रुग़्णालयात दाखल केले.

दरम्यान, या हल्लाप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी दिवसभर धरपकड करून पिंटू लोंढे, मारुती पाटोळे यांना अटक केली, तर सोन्या मांगले याचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Two arrested in sword attack case at hockey stadium