शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आंदोलनात सोन्याच्या चेन चोरणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 18:54 IST

Crimenews Kolhapur : मराठा समाज आरक्षण मूक आंदोलनासाठी नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधिस्थळी दोघा आंदोलकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन चोरट्यांनी लंपास केल्या. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोघांना घटनास्थळीच अटक केली. अविनाश बन्सी गायकवाड (४८) व जितेंद्र मुरलीधर काळे (५५ दोघेही रा. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने दि. २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देमराठा आंदोलनात सोन्याच्या चेन चोरणाऱ्या दोघांना अटक गर्दीचा फायदा उठवत चोरी : तिसरा साथीदार मुद्देमालासह फरार

कोल्हापूर : मराठा समाज आरक्षण मूक आंदोलनासाठी नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधिस्थळी दोघा आंदोलकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन चोरट्यांनी लंपास केल्या. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोघांना घटनास्थळीच अटक केली. अविनाश बन्सी गायकवाड (४८) व जितेंद्र मुरलीधर काळे (५५ दोघेही रा. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने दि. २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.कोल्हापुरातील ऐतिहासिक नर्सरी बागेत मराठा आरक्षण मूक आंदोलन होते. त्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आंदोलनासाठी आले होते. गर्दीचा फायदा उठवत चोरट्यांनी दोघा कार्यकर्त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसडा मारून लांबवल्या. याबाबत सतीश तुकाराम पोवार (३४, रा. कागल) याने आपल्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाची ५२ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन तर अजित रामराव इंगळे (४८, रा. कागल) यानेही आपल्या गळ्यातील १० ग्रॅमची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरट्यांनी लांबवल्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलिसांत दिली.दरम्यान, गर्दीचा फायदा उठवत सोन्याचे चेन चोरल्याच्या संशयावरून लक्ष्मीपुरी पोलिसांनी बीड येथील अविनाश गायकवाड व जितेंद्र काळे यांना अटक करून त्यांची चौकशी केली. प्रारंभी त्यांनी करमळा येथून आंदोलनासाठी आल्याचे सांगितले; पण नंतर पोलिसांनी खाक्या दाखवला असता बीडहून चोऱ्या करण्यासाठी आल्याची त्यांनी कबुली दिली. सहकारी अटक केल्याची माहिती मिळताच चोरलेल्या सोन्याच्या चेन घेऊन त्यांचा तिसरा साथीदार हा घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून कोल्हापूर-सांगली मार्गावर त्याचा माग काढण्याच्या प्रयत्न केला; पण तो सापडला नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस