गारगोटी येथील हल्लाप्रकरणी दोघे अटकेत, एक जण फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:16 IST2021-06-29T04:16:57+5:302021-06-29T04:16:57+5:30

गारगोटी : गारगोटी येथील खडक गल्‍लीतील पुरुषोत्तम र्फ राजू श्रीकांत कासार (वय-३१) या तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी करण विक्रम ...

Two arrested in Gargoti attack, one absconding | गारगोटी येथील हल्लाप्रकरणी दोघे अटकेत, एक जण फरार

गारगोटी येथील हल्लाप्रकरणी दोघे अटकेत, एक जण फरार

गारगोटी : गारगोटी येथील खडक गल्‍लीतील पुरुषोत्तम र्फ राजू श्रीकांत कासार (वय-३१) या तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी करण विक्रम आरडे, स्वागत महादेव जाधव यांना अटक करण्यात आली, तर विक्रम आरडे हा फरार आहे.

खडकगल्लीतील पुरुषोत्तम ऊर्फ राजू कासार हा शनिवारी दुपारी अंघोळीस जात असताना दबा धरून बसलेल्या विक्रम आरडे, करण आणि स्वागत यांनी कोयता व लोखंडी रॉडने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात कासार याच्या पायावर, उजव्या हातावर, पाठीवर वर्मी घाव लागले आहेत. त्याला तातडीने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, अजूनही त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ला करून हल्लेखोर फरार झाले होते. सोमवारी पोलिसांनी करण आरडे आणि स्वागत जाधव यांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना सहा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विक्रम आरडे हा अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Two arrested in Gargoti attack, one absconding