शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरजवळ दोन अपघात : एक ठार, १७ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 12:43 IST

कोल्हापूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार आणि १२ जण जखमी झाले. हे अपघात गुरुवारी पहाटे झाले.

ठळक मुद्देकोल्हापूरजवळ दोन अपघात : एक ठार, १७ जण जखमीदानवाड येथील कामगाराचा मृत्यूदुसऱ्या अपघातात शिवशाही बसची एस. टी. बसला धडक

कुरुंदवाड/कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार आणि १७ जण जखमी झाले. हे अपघात गुरुवारी पहाटे झाले.     कुरुंदवाड-भैरववाडी-नांदणी मार्गावर गणेश बेकरीच्या कामगारांना घेवुन नांदणीच्या दिशेने जाणारी बस उलटून एका कामगाराचा मृत्यू झाला. काशीनाथ शशिकांत बेरड (वय २८ रा. नवे दानवाड) असे त्याचे नाव आहे. बसमध्ये एकुन ४0 कामगार प्रवास करत होते. या कामगारापैकी १५ महिला जखमी झाल्याआहेत. गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

सूरज लकडे यांची ही बस असून त्यांनी ही बस (एम. एच. 0९ सी. व्ही 0७१८)  गणेश बेकरीच्या कामगारांना ने-आण करण्यासाठी भाड्याने दिली होती.  गुरुवारी सकाळी सहा वाजता ते दानवाड, टाकळी, राजापुर, कुरुंदवाड या भागातील बेकरी कामगारांना घेऊन कुरुंदवाड येथून निघाली होती. बसमध्ये एकूण ४० कामगार होते. सर्व जण गणेश बेकरीत कामाला जात होते.

बेकरीत वेळेत पोहोचावयाचे असल्याने चालक दत्ता बले (रा. नांदणी) हा बस भरधाव वेगाने हाकत होता. कुरुंदवाडीपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेला अरुंद पुल ओलांडताना त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कुरुंदवाड-नांदणी रस्त्यालगतच्या टोपले-पाटील यांच्या शेतात बस घुसली आणि उलटली.

या अपघातात चालकाच्या शेजारी बसलेल्या काशीनाथ बेरड या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील १५ महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दुसऱ्या अपघातात कोल्हापूरकडे येणाऱ्या शिवशाही बसने दुभाजक ओलांडून कोल्हापूरहून सांगलीकडे जाणाऱ्या एसटी.बसला हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे धडक दिली. या अपघातात वाहकासह दोघेजण किरकोळ जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी हा अपघात झाला.

कोल्हापूरकडे येणाऱ्या शिवशाही बसने हातकणंगले तालुक्यातील चोकाक बसस्थानकाजवळ दुभाजक ओलांडून कोल्हापूरहून सांगलीकडे जाणाऱ्या एस.टी.ला धडक दिली. या अपघातात एसटी बसच्या वाहकासह दोघेजण किरकोळ जखमी झाले.

या अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. एसटी बस रस्त्यातून बाजूला घेतली असून शिवशाही बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर