शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहावी परीक्षेत कोल्हापुरातील जुळ्या बहिणींना समान गुण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 16:12 IST

तीन विषयांमध्ये देखील दोघींना समान गुण

कोल्हापूर : एखाद्या बहिणी जुळ्या असू शकतात. त्या दिसायलाही एकसारख्याच असतील. पण, एखाद्या परीक्षेत त्यांना गुणही समानच मिळाले तर मात्र, ऐकावे ते नवलच असंच म्हणावं लागेल. कोल्हापुरातील उषाराजे हायस्कूलमधील पुण्यदा सुधांशू नाईक व भाग्यदा सुधांशू नाईक या जुळ्या बहिणींना दहावीच्या परीक्षेत ९७.४० टक्के असे समान गुण मिळाले आहेत. यातील तीन विषयांमध्ये दोघींनी समान गुण प्राप्त केले. पुण्यदा व भाग्यदा या ताराराणी विद्यापीठाअंतर्गत उषाराजे हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात. आठवीपर्यंत त्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले असून, पुढे त्या सेमी इंग्लिशमधून प्रवेशित झाल्या. दहावीच्या परीक्षेत या दोघींनीही उषाराजे हायस्कूलमध्ये विभागून द्वितीय क्रमांक मिळविला. पुण्यदाला पुढे मायक्रोबायोलॉजी करायचे असून, क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये पदवी घेण्याचा भाग्यदाचा मानस आहे. विशेष म्हणजे या दोघीही कथ्थक नृत्य शिकत असून, यातील चार परीक्षाही त्यांनी दिल्या आहेत.ट्रेकिंग, गडकिल्ल्यांची आवडसुधांशू नाईक हे दक्षिण आफ्रिकेत नोकरीस आहेत. त्यांच्या दोन्ही मुली या पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार. विशेष म्हणजे दोन्ही बहिणींना ट्रेकिंग, गडकिल्ले फिरण्याची प्रचंड आवड आहे. आपल्या आवडी-निवडी जपत त्यांनी या परीक्षेत चांगले यश मिळविले आहे. मुलींनी मिळविलेल्या या यशाचे कौतुक असल्याचे सुधांशू नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरssc examदहावीSSC Resultदहावीचा निकाल