हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे वीस हजार चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST2021-04-27T04:26:29+5:302021-04-27T04:26:29+5:30

कोल्हापूर : शाहुपुरी येथे हॉटेल शांतिदूत पॉपीलॉनमधील कर्मचाऱ्यांच्या बॅगमधील सुमारे २० हजारांची रोकड चोरीला गेली. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या ...

Twenty thousand thefts of hotel staff | हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे वीस हजार चोरीस

हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे वीस हजार चोरीस

कोल्हापूर : शाहुपुरी येथे हॉटेल शांतिदूत पॉपीलॉनमधील कर्मचाऱ्यांच्या बॅगमधील सुमारे २० हजारांची रोकड चोरीला गेली. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शाहुपुरी पोलीस ठाण्यात हर्षल शिवाजी गावडे (२५, रा. केरवडे, पाटीलवाडा, ता. चंदगड) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शांतिदूत लॉजच्या हॉलमध्ये गोरेश शंकर गावडे (२९, रा.नागनवाडी, ता. चंदगड) हे आपल्या सहकाऱ्यांसोबत झोपले होते. त्यावेळी संशयित हर्षल गावडे हा लॉजच्या उघड्या दरवाजातून आत येऊन त्याने हॉटेल शांतिदूत पॉपीलॉनमधील स्टाफरूममध्ये प्रवेश केला. तसेच तेथील सहकाऱ्यांच्या बॅगमधील २० हजार रुपयांची चोरी केली, अशी फिर्याद गोरेश गावडे याने शाहुपुरी पोलीस ठाण्यात दिली, त्यानुसार हर्षल गावडे याच्यावर पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: Twenty thousand thefts of hotel staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.