करंजफेन, सावर्डी येथील वीस घरे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:25 IST2021-07-31T04:25:55+5:302021-07-31T04:25:55+5:30

अणूस्कुरा : कासारी नदीच्या महापुराचे पाणी घरात शिरल्यामुळे करंजफेन (ता. शाहूवाडी ) येथे आठ व सावर्डी येथील बारा अशी ...

Twenty houses in Karanjfen, Savardi | करंजफेन, सावर्डी येथील वीस घरे जमीनदोस्त

करंजफेन, सावर्डी येथील वीस घरे जमीनदोस्त

अणूस्कुरा : कासारी नदीच्या महापुराचे पाणी घरात शिरल्यामुळे करंजफेन (ता. शाहूवाडी ) येथे आठ व सावर्डी येथील बारा अशी एकूण वीस घरे जमीनदोस्त झाली आहेत. तसेच सावर्डी ते करंजफेन मार्गावर पाच ठिकाणी डोंगर खचल्याने हा रस्ता बंद झाला. त्यामुळे सावर्डी व इजोली गावांचा अद्याप संपर्क तुटला आहे.

२२ जुलैला मध्यरात्री पुराचे पाणी घरात शिरल्याने लोकांची धांदल उडाली होती. सावर्डी येथील बाळू कोकरे यांच्या दोन म्हैसी गोठ्यातच अडकल्या, त्यांच्या अंगावर दगड,माती, लाकूड सामान पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. करंजफेनमधील बाळू शंकर कांबळे ,रंगराव लक्ष्मण कांबळे, राजाराम लक्ष्मण कांबळे, संतू लक्ष्‍मण कांबळे प्रदीप फाटक ,मानसिंग पाटील, नानूबाई कांबळे, अमीन शेख, अल्ताफ शेख, मोजेम शेख यांची घरे उद्‌ध्वस्त झाली. सावर्डी येथील धोंडीराम बाळू राठोड, पांडुरंग सकपाळ, कृष्णा पाडावे, बंडू रामा पाडावे, चंद्रकांत कोंडीबा पाडावे, राजाराम नारायण पाटील ,तुकाराम सदाशिव जाधव, तुकाराम धोंडीराम कांबळे, बाळु महादु कोकरे यांनी गावातील प्राथमिक शाळेत संसार मांडला आहे. सर्व शेतकऱ्यांचे सव्वाशे पोती धान्य मातीत गाडले गेले. त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

फोटो ३० सावर्डी अणुस्कुरा

फोटो :-सावर्डी ता शाहूवाडी येथील धोंडीराम ऱ्हाटवड यांचे घर जमीनदोस्त होऊन सुमारे चाळीस पोती धान्य गाडले गेले.

Web Title: Twenty houses in Karanjfen, Savardi