जिल्ह्यात वीस इंग्रजी शाळा अनधिकृत
By Admin | Updated: May 21, 2014 01:16 IST2014-05-21T01:16:59+5:302014-05-21T01:16:59+5:30
मराठी माध्यमाच्याही पंधरा शाळांचा समावेश : शाळा बंद करण्याचा आदेश

जिल्ह्यात वीस इंग्रजी शाळा अनधिकृत
कोल्हापूर :जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या वीस व मराठी माध्यमाच्या पंधरा प्राथमिक शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्यावतीने देण्यात आली आहे. या शाळा त्यांनी तत्काळ बंद कराव्यात. या शाळांना एक लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तेव्हा पालकांनी या शाळांत मुलांसाठी प्रवेश घेऊ नयेत. अन्यथा, त्यांच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी पालकांवर राहील. शाळांची नावे अशी : इंग्रजी शाळा : नवकृष्णा व्हॅली उत्तूर (पहिली), जीजी इंग्रजी प्राथमिक शाळा मसुद माले (पहिली व दुसरी), ज्ञानदीप अंबप (पहिली व दुसरी), प्रियदर्शनी हिंगणगाव, सिद्धीकी अॅन्ड फारुकी हुपरी (पहिली ते चौथी) पंडितराव खोपकर सावरवाडी (पहिली व दुसरी), जीवनदीप एन्टायर स्कूल कोपार्डे फाटा (पहिली ते सहावी), बळवंतराव कोरे मुडशिंगी (पहिली ते चौथी), विद्याभवन उजळाईवाडी (पहिली ते चौथी), गुरुकुल मुडशिंगी (पहिली), ज्ञानकला उचगाव (पहिली ते दुसरी), मालू स्कूल शिरोळ (पहिली ते चौथी), दत्त प्राथमिक नृसिंहवाडी (पहिली ते तिसरी), दत्त बालक मंदिर शिरोळ (पहिली ते चौथी), आर्मी पब्लिक स्कूल शिरोळ (पहिली ते चौथी), जान्हवी स्कूल गणेशवाडी (पहिली ) फौंडेशन कवठेगुलंद (पहिली ते चौथी). मराठी शाळा : ज्ञानप्रकाश सोनवडे (पहिली ते सहावी), सृजनानंद विद्यालय कोल्हापूर (पाचवी ते सहावी), ओमसाई निवासी शाळा पिरवाडी (पहिली ते सातवी), बी. एम. टोणपी हायस्कूल हलकर्णी, ता. गडहिंग्लज (इयता आठवी), भैरवनाथ माध्यमिक ऐनवडे (इयता आठवी), विठ्ठलराव हंचाटे नंदवाळ (इयता आठवी), मुमताज हायस्कूल सांगाव (इयत्ता आठवी), शाहू माध्यमिक ढेकोळी (इयता आठवी), सर्वोदय म्हाळुंगे खालसा (इयत्ता आठवी), गवसे हायस्कूल गवसे (इयत्ता आठवी), माडवळे हायस्कूल माडवळे (इयत्ता आठवी), मुगळी सोनारवाडी विद्यालय मुगळी, (ता. चंदगड, इयत्ता आठवी), उर्दू हायस्कूल रुकडी (इयत्ता आठवी), कुटवाड हायस्कूल कुटवाड (इयत्ता आठवी), उर्दू हायस्कूल कनवाड (इयत्ता आठवी). (प्रतिनिधी)