शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक पन्हाळगड लाइट, साउंड, लेझर शो'ने उजळणार, बारा कोटींचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 14:04 IST

पहिले तीन कोटी रुपये नगरपरिषदेकडे जमा

पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडावर लाईट, साउंड, लेझर शोसाठी बारा कोटींचा निधी देण्यात यावा, या आपल्या मागणीला राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.  याविषयी पर्यटन विभागाच्या संचालकांकडे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अवर सचिवांनी अभिप्राय मागविला.  पन्हाळगडावर या प्रकल्पासाठी बारा कोटींचा निधी मंजुरीचा आदेश रात्री उशिरा मिळाला असून, यातील पहिले तीन कोटी रुपये नगरपरिषदेकडे जमा झाल्याचे नगरपरिषद प्रशासक व मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी सांगितले.  यासाठी खासदार धैर्यशील माने व आमदार डॉ. विनय कोरे यांचे प्रयत्न यशस्वी ठरले.

खासदार धैर्यशील माने म्हणाले,आपण काही दिवसांपूर्वी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन, ऐतिहासिक पन्हाळगडावर लाइट, साउंड, लेझर शोसाठी बारा कोटींचा मंजूर निधी तांत्रिक मान्यतेअभावी परत गेल्याचे निदर्शनास आणून दिले, तसेच हा निधी पुन्हा मंजूर करावा, अशी मागणी केली होती. सेना-भाजप सरकारच्या काळात २०१६/१७ साली जिल्हा पर्यटन विकास योजनेंतर्गत पन्हाळगडावर या प्रकल्पासाठी बारा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक मान्यता वेळेत न मिळाल्याने हे काम पूर्ण झाले नाही.पन्हाळगडाचे ऐतिहासिक महत्त्व, गडाला भेट देणारे पर्यटक, शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित लाइट, साउंड, लेझर शोचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रस्तावित परत गेलेला निधी पुन्हा मंजूर करावा, अशी मागणी केली होती. यावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी योग्य कार्यवाही करत पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाच्या अवर सचिवांकडे हा प्रस्ताव पाठवला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर