शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावजवळ टस्कर हत्तीचा थरार, वनविभागाने जंगलात पिटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 15:50 IST

बेळगाव : अचानक दाखल झालेल्या टस्कर हत्तीने लहान कंग्राळीसह शहरातील शाहूनगर, वैभवनगर परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ...

बेळगाव : अचानक दाखल झालेल्या टस्कर हत्तीने लहान कंग्राळीसह शहरातील शाहूनगर, वैभवनगर परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. गेल्या मे २०२३ नंतर महाराष्ट्रातील जंगलातून दुसऱ्यांदा कर्नाटक हद्दीत आलेल्या या टस्करने कोणाला इजा केली नसली, तरी वाहनांचे नुकसान केले. वनविभागाने शुक्रवारी दुपारी हत्तीला जंगलात पिटाळले. महाराष्ट्राच्या हद्दीत दुपारी गेलेला हत्तीने पुन्हा सायंकाळी सीमेवरील बेक्कीनकेरेत येऊन धुमाकूळ घातला. वनखात्याने पुन्हा त्याला महाराष्ट्राच्या दिशेने हुसकावण्यात यश मिळविले.याबाबतची माहिती अशी की, टस्कर हत्तीने सकाळी साडेपाचच्या सुमारास लहान कंग्राळीमध्ये प्रवेश केला. तेथून तो बॉक्साइट रोडमार्गे शाहूनगर आणि वैभवनगरच्या दिशेने गेला. हत्तीने तेथील रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान केले. एका कारची काच फोडण्याबरोबरच दोन-तीन दुचाकी त्याने सोंडेने भिरकावून टाकल्या. शाहूनगर येथे दुचाकीची सीट उचकटून फेकून दिली.आक्रमक झालेल्या हत्तीमुळे घाबरलेल्या नागरिकांनी घरात कोंडून घेणे पसंद केले. काही उत्साही लोकांनी घरांच्या छतावरून मोबाइलवर हत्तीच्या कारनाम्याचे चित्रीकरणही केले. शाहूनगर व वैभवनगर येथून तो टस्कर शेतातून मोठ्या कंग्राळीच्या दिशेने गेला. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.टस्करच्या आगमनाची माहिती मिळताच, बेळगाव वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ विशेष मदत पथकांची निर्मिती करून घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्या हत्तीला शाहूनगर, वैभवनगर येथून सुरक्षितपणे हुसकावत मोठ्या कंग्राळीमार्गे पुन्हा लहान कंग्राळीकडे आणले. हत्तीच्या मागे आणि पुढे वनखात्याची पथके कार्यरत होती. हत्तीसमोर सुरक्षित अंतर ठेवून मोटारसायकलवरून जाणारे वनाधिकारी सावधगिरीचा इशारा देताना दिसत होते. वनखात्याच्या पथकाने लहान कंग्राळी येथून त्या हत्तीला मोठ्या कौशल्याने अगसगे, बेक्कीनकेरीमार्गे दुपारी सव्वाबाराच्या सुमारास महाराष्ट्र हद्दीतील जंगलात हुसकावून लावले. यासाठी बेळगाव वनविभागाचे अधिकारी महाराष्ट्राच्या वनाधिकाऱ्यांची संधान साधून होते.हत्तीला जंगलात हुसकावून लावल्यानंतर तो पुन्हा माघारी फिरू नये, यासाठी वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी बराच काळ जंगलाच्या सीमेवर तळ ठोकून होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावforest departmentवनविभाग