शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तांवर कोल्हापुरात एक हजारांवर कोटींची उलाढाल; सवलती, ऑफर्समुळे ग्राहक झाले आकर्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 17:19 IST

वाहनांच्या मार्केटमध्ये गर्दी

कोल्हापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दीपावली पाडव्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल बाजारपेठेत झाली. सोने, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि रिअल इस्टेटसारख्या मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. अनेक दुकानांनी आकर्षक सवलती आणि ऑफर्स दिल्याने बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली. अनेक ठिकाणी शून्य टक्के व्याजदर आणि ई-कॉमर्सवर विशेष सूट देऊन ग्राहकांना आकर्षित केले. पाडव्यानिमित्त खरेदीला कोट्यवधींच्या उलाढालीचे तेज आले.दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत बुधवार हा बाजारपेठेत खरेदीची पर्वणी देणारा ठरला. दुचाकी, चारचाकी वाहनांसह सोने, इलेक्ट्रॉनिक्स गृहोपयोगी वस्तू, गॅझेट्स आणि रिअल इस्टेट मार्केटमध्ये कोट्यवधींची उलाढाल झाली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानलेल्या या शुभदिवशी गॅस शेगडीपासून ते आलिशान वाहनांपर्यंतची खरेदी झाली. सकाळपासूनच बाजारपेठेत खरेदीची पर्वणी सुरू होती. शहरातील डिलर्सकडूनही ग्राहकांसाठी खास आकषक सवलतींसह विविध एक्स्चेंज ऑफर्स दिल्याने खरेदीला उधाण आले. पाडव्यानिमित्त खरेदीला कोट्यवधींच्या उलाढालीचे तेज आले.सोने खरेदीने गुजरी लखलखलीपाडव्यादिवशी गुंजभर सोन्यापासून ते वजनदार दागिन्यांच्या खरेदीसाठी झालेल्या गर्दीने शहरातील गुजरीसह सराफ बाजारपेठ फुलून गेली. लग्नाच्या दागिन्यांच्या खरेदीलाही अनेकांनी पाडव्याच्या मुहूर्तालाच पसंती दिल्यामुळे गुजरी सोने खरेदीने लखलखली. चांदीच्या वस्तूंचीही खरेदी पाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात झाली.वाहनांच्या मार्केटमध्ये गर्दीबाइक, मोपेड आणि स्पोर्टस् बाइकच्या खरेदीला जास्त मागणी राहिली. तरुणाईची मागणी बुलेट आणि स्पोर्टस बाइकला असून, दीडशे सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या बाइक खरेदी करण्याकडेही तरुणाईचाच कल राहिला. वाहनाची डिलिव्हरी घेण्यासाठी सकाळपासूनच शोरूम्सचा आवार गजबजून गेला एक्स्चेंज ऑफरसह कमीत कमी डाऊन पेमेंट या सुविधेला ग्राहकांकडून अधिकाधिक प्रतिसाद मिळाला.आकर्षक ‘ऑफर्स’ची बरसातग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बहुतांश व्यावसायिकांनी खास सवलत दिली. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, कॉस्मेटिक्स आणि इतर अनेक वस्तूंवर १० ते ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळाली. अनेक व्यावसायिकांनी ‘बाय वन, गेट वन’सारख्या सवलतीही दिल्या. दागिन्यांच्या घडणावळीवर भरघोस सूट दिली.

इलेक्ट्रॉनिक्स मार्केट गजबजलेदिवाळी पाडवा आणि भाऊबीज या सणांच्या गिफ्ट खरेदीसाठी शहरातील स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मार्केट गर्दीने गजबजले. आय फोन्ससह स्मार्ट फोनची नवी रेंजही बाजारपेठेत आली. ऑनलाइन मार्केटच्या स्पर्धेला इलेक्ट्रॉनिक डिलर्सनी जोरदार टक्कर दिली.

साडेतीन मुहूर्तांवर सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली. सणानिमित्त भावही कमी झाल्याने त्याचा फायदा ग्राहकांनी घेतला. - देवीचंद ओसवाल, महेंद्र ज्वेलर्सजीएसटी कमी झाल्याने आणि अनेक ऑफर्सचा वर्षाव ग्राहकांवर करण्यात आला. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली. - गिरीश शाह, गिरीश सेल्सप्रत्येकाला आपल्या हक्काचे घराचे स्वप्न असते. सणाचा मुहूर्त साधून अनेकांनी ही पर्वणी साधली. बांधकाम व्यवसायाला चांगला बूस्ट मिळाला. - करण पाटील, श्री बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur sees billion-rupee Diwali Padwa sales, boosted by offers.

Web Summary : Kolhapur witnessed booming sales on Diwali Padwa, exceeding a billion rupees. Gold, vehicles, electronics, and real estate saw high demand due to discounts and zero-interest offers, attracting many customers.