तुरेवाला सर्पगरूड, मोरघार, लालपंखी होला पक्षी गणनेचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:21+5:302021-01-08T05:16:21+5:30

कळंबा तलावावर ९८ प्रजातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद, १६ प्रजातींचे स्थलांतरित पक्षी लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दलदली हारीन, कैकर, ...

Turewala serpent eagle, peacock, red bird hola bird counting attractions | तुरेवाला सर्पगरूड, मोरघार, लालपंखी होला पक्षी गणनेचे आकर्षण

तुरेवाला सर्पगरूड, मोरघार, लालपंखी होला पक्षी गणनेचे आकर्षण

कळंबा तलावावर ९८ प्रजातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद, १६ प्रजातींचे स्थलांतरित पक्षी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : दलदली हारीन, कैकर, तुरेवाला सर्पगरुड, मोरघार, लालपंखी होला या पक्ष्यांची नोंद ‘बर्डस ऑफ कोल्हापूर’ या ग्रुपने रविवारी केलेल्या कळंबा तलावावरील पक्षिगणनेत झाली आहे. या पक्षिगणनेत ९८ प्रजातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद झाली. यातील १६ प्रजाती या स्थलांतरित पक्ष्यांच्या आहेत.

जिल्ह्यातून ३० पेक्षा जास्त पक्षिनिरीक्षकांनी या पक्षिगणना उपक्रमात सहभाग नोंदविला. जमा झालेल्या माहितीची ‘वेटलँड इंटरनॅशनल’ या पर्यावरणीय संघटनेच्या ‘इंटरनॅशनल वॉटरबर्ड सेन्सस’मध्ये नोंद करण्यात येत आहे.

कोल्हापुरात दर रविवारी विविध परिसरांत ही पक्षिगणना होणार आहे. पुढील गणना १० जानेवारी रोजी सकाळी ६.४५ पासून राजाराम तलावावर केली जाणार आहे, अशी माहिती या ग्रुपचे समन्वयक प्रणव देसाई आणि सतपाल गंगलमाले यांनी दिली. पक्षितज्ज्ञ आशिष कांबळे, ज्येष्ठ पक्षिमित्र दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पक्षिगणनेत अभिषेक शिर्के, पृथ्वीराज सरनोबत यांच्यासह अनेक पक्षिनिरीक्षक सहभागी झाले होते.

संकटग्रस्त प्रजातींचीही नोंद

आययूसीएनने संकटग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या तिरंदाज, नदी सुरय, काळ्या डोक्याचा शराटी या प्रजातीही या तलावावर आढळल्या. या तलावाकडे नाम्या हा रहिवासी पक्षी, तसेच स्थलांतरित बदके मात्र आढळून आली नाहीत.

कोट

अन्नसाखळीच्या टोकाला असणाऱ्या विविध पक्ष्यांची उपस्थिती असणे, यातूनच कळंबा तलाव जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय समृद्ध असल्याचे सिद्ध होत आहे.

- सतपाल गंगलमाले

समन्वयक, बर्डस‌् ऑफ कोल्हापूर

--------------------------

फोटो : 0६0१२0२१-कोल-बर्ड वॉचिंग 0१

0६0१२0२१-कोल-बर्ड वॉचिंग 0२

फोटो ओळी : कोल्हापुरात ‘बर्डस‌् ऑफ कोल्हापूर’ या ग्रुपने आयोजित केलेल्या कळंबा तलावावरील पक्षिगणनेत पक्षिनिरीक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

फोटो : 0६0१२0२१-कोल-तुरेवाला सर्पगरुड

फोटो : 0६0१२0२१-कोल-मोरघार

फोटोओळी : ‘बर्डस ऑफ कोल्हापूर’ या फेसबुक ग्रुपने आयोजित केलेल्या कळंबा तलावावरील पक्षिगणनेत तुरेवाला सर्पगरुड, मोरघार या पक्ष्यांची नोंद करण्यात आली.

(संदीप आडनाईक)

Web Title: Turewala serpent eagle, peacock, red bird hola bird counting attractions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.