तुरेवाला सर्पगरुड, मोरघार, लालपंखी होला पक्षिगणनेचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST2021-01-08T05:22:31+5:302021-01-08T05:22:31+5:30

कळंबा तलावावर ९८ प्रजातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दलदली हारीन, कैकर, तुरेवाला सर्पगरुड, मोरघार, लालपंखी ...

Turewala serpent eagle, peacock, red bird hola bird count attraction | तुरेवाला सर्पगरुड, मोरघार, लालपंखी होला पक्षिगणनेचे आकर्षण

तुरेवाला सर्पगरुड, मोरघार, लालपंखी होला पक्षिगणनेचे आकर्षण

कळंबा तलावावर ९८ प्रजातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : दलदली हारीन, कैकर, तुरेवाला सर्पगरुड, मोरघार, लालपंखी होला या पक्ष्यांची नोंद ‘बर्डस ऑफ कोल्हापूर’ या ग्रुपने रविवारी (दि. ३१) केलेल्या कळंबा तलावावरील पक्षिगणनेत झाली आहे. या पक्षिगणनेत ९८ प्रजातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद झाली. यातील १६ प्रजाती या स्थलांतरित पक्ष्यांच्या आहेत.

जिल्ह्यातून ३० पेक्षा जास्त पक्षिनिरीक्षकांनी या पक्षिगणना उपक्रमात सहभाग नोंदविला. जमा झालेल्या माहितीची ‘वेटलँड इंटरनॅशनल’ या पर्यावरणीय संघटनेच्या ‘इंटरनॅशनल वॉटरबर्ड सेन्सस’मध्ये नोंद करण्यात येत आहे. कोल्हापुरात दर रविवारी विविध परिसरांत ही पक्षिगणना होणार आहे. पुढील गणना १० जानेवारी रोजी सकाळी ६.४५ पासून राजाराम तलावावर केली जाणार आहे, अशी माहिती या ग्रुपचे समन्वयक प्रणव देसाई आणि सतपाल गंगलमाले यांनी दिली. पक्षितज्ज्ञ आशिष कांबळे, ज्येष्ठ पक्षिमित्र दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पक्षिगणनेत अभिषेक शिर्के, पृथ्वीराज सरनोबत यांच्यासह अनेक पक्षिनिरीक्षक सहभागी झाले होते.

Web Title: Turewala serpent eagle, peacock, red bird hola bird count attraction