तुंबलेल्या गटारी, रस्त्यावर सांडपाणी

By Admin | Updated: December 29, 2014 00:45 IST2014-12-28T22:52:42+5:302014-12-29T00:45:45+5:30

राखीव प्रभागात समस्याही राखीव : अपुरा पाणीपुरवठा, कचरा समस्या, खराब अंतर्गत रस्ते

Tumbled sewage, street sewage treatment | तुंबलेल्या गटारी, रस्त्यावर सांडपाणी

तुंबलेल्या गटारी, रस्त्यावर सांडपाणी

कोल्हापूर : बहुतांश कॉलनीचा भाग असलेली वस्ती म्हणजे पाटोळेवाडी-कदमवाडी प्रभाग होय. या प्रभागात मुख्य रस्ते झाले; पण काही कॉलन्यांमधील अंतर्गत रस्ते तसे पडून असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर पाटोळेवाडीच्या परिसरात पिछाडीस सांडपाणी जाण्याची व्यवस्था नसल्याने ते पाणी थेट शेजारील शेतात जाते. तसेच सह्याद्री हौसिंग सोसायटी उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेचा अक्षरश: कोंडाळा झाला आहे. या आरक्षित जागेवर लवकरात लवकर उद्यान व्हावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दुसरीकडे नगरसेविका रेखा आवळे या सतत संपर्क असल्यामुळे या प्रभागातील समस्या सोडविल्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पाटोळेवाडी-कदमवाडी हा प्रभाग (क्रमांक १३) राखीव मतदारसंघ आहे. या प्रभागात सुमारे पाच हजार ७४२ मतदार आहेत. या प्रभागात कपूर वसाहत, घाटगे कॉलनी, शिवराज कॉलनी, विजयनगर कॉलनी, ग्रीन पार्क, डी. वाय. पाटील महाविद्यालयाची पिछाडीची बाजू, सह्याद्री हौसिंग सोसायटी अशी बहुतांश कॉलनीची रचना आहे; तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांची वस्ती आहे. सर्वसामान्य व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या याठिकाणी आहे. विशेषत: कॉलनीतील नागरिकांसह सर्वसामान्यांच्या तक्रारींची दखल स्थानिक नगरसेविका घेतात. विशेषत: कदमवाडी येथील कपूर वसाहतीमधील कदमवाडी स्मशानभूमीचे काम नगरसेविकांनी चांगले केले आहे.
कदमवाडी रस्त्यावरील या प्रभागाचा शेवटचा भाग म्हणजे सह्याद्री हौसिंग सोसायटी. येथे रोज दुपारी एक वाजता, तर रात्री आठ वाजता पाणी येते; पण त्याचा दाब कमी असतो. त्यामुळे नागरिकांना अपुरे पाणी मिळते आहे. हा पाण्याचा प्रश्न सोडवावा, तसेच डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजजवळ रिक्षाथांबा आहे. त्या चौकातून ते घाटगे कॉलनीपर्यंतचा मुख्य रस्ता नवीन करावा, अशी मागणी होत आहे.


या प्रभागात मुख्य रस्ते, कपूर वसाहती-मधील कदमवाडी स्मशानभूमी चांगली केली आहे. कोणत्याही स्थितीत सह्याद्री हौसिंग सोसायटीमधील आरक्षित जागेवर उद्यान होण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहे. उर्वरित दहा महिन्यांत जास्तीत जास्त विकासनिधी आणून प्रभागात अलौकिक काम करू.
- रेखा अनिल आवळे,
नगरसेविका.


प्रतिबिंब प्रभागाचे


गणेश शिंदे

Web Title: Tumbled sewage, street sewage treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.