तुळजापूर-मालवण एस.टी.ला अपघात

By Admin | Updated: May 12, 2016 23:56 IST2016-05-12T22:33:08+5:302016-05-12T23:56:07+5:30

कोल्हापूरजवळ घटना : चालकासह २९ प्रवासी जखमी; डंपरला धडक

Tuljapur-Malvan ST Accidents | तुळजापूर-मालवण एस.टी.ला अपघात

तुळजापूर-मालवण एस.टी.ला अपघात

शिरोली : तुळजापूर-मालवण एस.टी. बसने डंपरला पाठीमागून धडक दिल्याने बस महामार्गाच्या दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात बस चालकासह २९ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-बंगळूर महामार्गावर शेजारी शिरोलीच्या हद्दीत सायंकाळी साडेपाच वाजता झाला.
अधिक माहिती अशी की, एस.टी. (एमएच २० बी एल-२९५७) तुळजापूरहून मालवणला भरधाव वेगाने चालली होती. शिरोलीच्या हद्दीत महामार्गावरून जात असताना पंचगंगा नदीशेजारी बसने पुढील डंपरला (एमएच ०९ एल ९११५) मागून धडक दिली. एसटीचालक एस. एन. सुवेर्शे याचा गाडीवरील ताबा सुटला आणि ब्रेक अडकल्याने एस.टी. दुभाजकावर जोरदार आदळली. यात २९ प्रवासी जखमी झाले. जखमींत दहा महिलांचा समावेश आहे. सर्वांवर सीपीआरमध्ये उपचार केले. जखमी प्रवासी सांगली, मिरज, उस्मानाबाद आणि कोल्हापूर येथील आहे.
जखमींना बस व रिक्षाने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. जखमींची नावे - उत्कर्षा जगन कराडे (वय २०) सुजाता जगन कराडे (४०) उज्ज्वल जगन कराडे (१५), चैतन्य कार्वेकर (३५), प्रणोती दशरथ ढवळे (२४), रेवती दशरथ ढवळे (२०), राजश्री दशरथ ढवळे (४८, सर्व रा. सांगली). शीला प्रताप जमादार (४०), प्रियांका प्रताप जमादार (१४), सुशीला बबरू स्वामी (५०), बबरू शिवाप्पा स्वामी (६०, सर्व रा. मिरज), त्याचबरोबर प्रफुल्ल शशीराव सूर्यवंशी (२५, रा. उमरगा, जि. उस्मानाबाद). अपघातात बसचालक जखमी झाले आहेत. यामध्ये १२ जखमींवर सीपीआर तर आठ जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, या आपघातानंतर महामार्गावरील सर्व वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, आपघाताची ची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात रात्री उशीर सुरू होती. (प्रतिनिधी)

Web Title: Tuljapur-Malvan ST Accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.