शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

प्रभावी उपाययोजनांमुळे क्षयरोग नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 18:47 IST

Health Collcator Kolhapur-कोरोनाबरोबरच क्षयरोग निदान एकाचवेळी करण्यात येत असल्याने क्षयरोगाचे लवकर निदान होत आहे. प्रभावी उपाययोजनांमुळे क्षयरोगाचा प्रसार कमी झाल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्देप्रभावी उपाययोजनांमुळे क्षयरोग नियंत्रणातजिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गौरविले

कोल्हापूर : कोरोनाबरोबरच क्षयरोग निदान एकाचवेळी करण्यात येत असल्याने क्षयरोगाचे लवकर निदान होत आहे. प्रभावी उपाययोजनांमुळे क्षयरोगाचा प्रसार कमी झाल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी केले.शाहू स्मारक भवनात जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. डी. माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नाव, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, डॉ. फारूख देसाई, मानसी कदम, डॉ. विनायक भोई उपस्थित होते. यावेळी क्षयरोग नियंत्रणात आणल्याबद्दल केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सिल्वर मेडल सर्टिफिकेशन प्रदान करून गौरविण्यात आले.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, समाजामधील सर्व घटकांनी मिळून कोरोना-टी.बी.बद्दल जनआंदोलन उघडले, तरच या आजारावर आपण विजय मिळवू शकतो. आपल्याकडे शासकीय विभागात कोरोना-टी.बी.बद्दल अत्यंत उच्च दर्जाचे निदान तंत्रज्ञान मोफत उपलब्ध आहे. याचा लाभ सर्व लोकांनी करून घ्यावा.मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी, जिल्ह्यातील तालुके क्षयमुक्त तालुके म्हणून निवडलेले आहेत. ही क्षयमुक्त भारताकडे वाटचाल आहे. सर्व खासगी डॉक्टरांनी सर्व क्षयरुग्णांची नोंद निक्षयमध्ये करण्याचे आवाहन केले. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी प्रास्ताविक केले. नामदेव सावंत व नयना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनिल मडके यांनी कोरोना व क्षयरोग परस्परसंबंध सद्यस्थिती या विषयावर व्याख्यान दिले.

टॅग्स :Healthआरोग्यcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर