शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘वटमुखत्यार’पत्राने जमीन विकण्याचा प्रयत्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2015 00:04 IST

बेकायदेशीर व्यवहार : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, ‘धर्मादाय’ची परवानगी नाही--‘इंचनाळ गणपती’च्या जमिनीची कुळकथा

राम मगदूम -गडहिंग्लज --‘इंचनाळ’ गावच्या सात-बारा पत्रकी ‘श्री गणपती देवा’ची मालकी असणारी देवस्थानची शेतजमीन केवळ वटमुखत्यारपत्राच्या आधारेच मूळ वहिवाटदार गजानन बाळकृष्ण जोशी व त्यांच्या वारसांना अंधारात ठेवून आपल्या प्रापंचिक कारणासाठी विकण्याचा प्रयत्न मनोहर बाळकृष्ण जोशी-दंडगे या वटमुखत्याराने केला आहे. त्यास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि धर्मादाय आयुक्तांकडून कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. यामुळेच जमीन खरेदी-विक्रीचा हा व्यवहार बेकायदेशीर ठरला आहे.पूर्वीपासूनच सात-बारा आणि ८-अ पत्रकी मालक कोष्टकी ‘श्री गणपती देव’ अशी नोंद आहे. मात्र, या जमिनीचे वहिवाटदार असणाऱ्या श्री गजानन बाळकृष्ण जोशी यांनी आपले भाऊ मनोहर यांना ५० वर्षांपूर्वी एक वटमुखत्यारपत्र करून दिले होते. त्या आधारेच ही जमीन खरेदी-विक्रीचा प्रयत्न झाला आहे. पूजा-अर्चा आणि देखभालीची जबाबदारी पार न पाडताच देवाची जमीन विकण्याचा व हडपण्याचा प्रयत्न झाल्यामुळेच ग्रामस्थ व गणेशभक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.२७ नोव्हेंबर १९५९ रोजी गजानन बाळकृष्ण जोशी यांच्याकडून मिळालेल्या वटमुखत्यारपत्राच्या आधारेच मनोहर बाळकृष्ण जोशी-दंडगेनी आनंदराव धोंडिबा पोवार यांना देवस्थानची सहा एकर २९ गुंठे इतकी जमीन केवळ १६ लाखांस खरेदी देण्याचे करारपत्र स्टँम्पवर करून दिले आणि संचकारापोटी दहा लाख रूपये घेतले आहेत. १० आॅक्टोबर २००३ रोजीच मनोहर यांनी संचकाराचा हा करार आनंदराव पोवार यांना करून दिला. तथापि, या करारापूर्वीच अनिलकुमार राजाराम दड्डीकर (रा.गडहिंग्लज ) व बाळकू भीमा पोवार (रा. इंचनाळ) या दोघांनाही काही रकमेच्या व्याजात भोगवट्यासाठी सदरची जमीन दिली होती. दड्डीकर यांची मुदत २०१० च्या चैत्र पाडव्यापर्यंत, तर बाळकू पोवारांची मुदत २४ जुलै २०१६ पर्यंत असल्याचेही त्याच संचकारपत्रात नमूद आहे.दरम्यान, ११ डिसेंबर २००९ रोजी १०० रूपयाच्या स्टँम्पवरील पुरवणी करारपत्र व ताबा पावतीनुसार मनोहर जोशी-दंडगे यांनी आनंदराव पोवार यांच्याकडून दोन लाख ८५ हजार धनादेशाने स्वीकारून दड्डीकर यांचे मयत वारस सुनीता दड्डीकर यांना अदा केली. आणि त्या जमिनीचा कब्जा आनंदराव पोवार यांच्या ताब्यात दिला आहे. संचकारपत्र आणि पुरवणी करारपत्रावरूनच ‘देवा’ची ही शेतजमीन आनंदराव पोवार यांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. जमिनीचा मालक गणपती देवच !इंचनाळ गावच्या सात-बारा व ८ अ उताऱ्यावर मालक कोष्टकी श्री गणपती देवाची नोंद असून गजानन बाळकृष्ण जोशी हे वहिवाटदार आहेत.२७ नोव्हेंबर १९५९ रोजी गजानन बाळकृष्ण जोशी यांनी आपला भाऊ मनोहर यांना या जमिनीसंदर्भातील वटमुखत्यारपत्र करून दिले. त्या वटमुखत्यारपत्राच्या आधारेच त्यांनी ही जमीन विकण्याचा प्रयत्न केला आहे.१० आॅक्टोबर २००३ रोजी मनोहर जोशी-दंडगे यांनी प्रापंचिक कारणासाठी आनंदराव पोवार यांना ही जमीन करारपत्राने १६ लाखाला खरेदी दिली व संचकारापोटी दहा लाख रूपये स्वीकारले.११ डिसेंबर २००९ रोजीच्या पुरवणी करारपत्र व ताबा पावतीनुसार मनोहर जोशी यांनी पोवार यांच्याकडून दोन लाख ८५ हजार इतकी रक्कम चेकने स्वीकारली आणि दड्डीकर यांचे देणे भागवून जमिनीचा कब्जा आनंदराव पोवार यांच्या ताब्यात दिला.