प्रयत्न छोटा ‘पाणी बचती’चा संदेश देणारा
By Admin | Updated: May 17, 2016 01:16 IST2016-05-17T00:51:21+5:302016-05-17T01:16:13+5:30
देवपूजेच्या पाण्यावर जगविली झाडे : बेलबागेतील सुलोचना जाधव यांचा उपक्रम

प्रयत्न छोटा ‘पाणी बचती’चा संदेश देणारा
पाटेठाण : टाकळी भीमा (ता. दौंड) येथील प्राथमिक शाळेतील १५ विद्यार्थ्यांना माजी आमदार रंजना कुल व तहसीलदार उत्तम दिघे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी १५ सायकली मंजूर झाल्या होत्या, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय ठोंबरे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्यामुळे शाळेत ये-जा करण्यासाठी सोयीचे झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
या वेळी गटविकासअधिकारी संतोष हराळे, जिल्हा परिषद सदस्य बंडोपंत नवले, पंचायत समिती सदस्य किसन शिंदे, सरपंच रूपाली गरदरे, उपसरपंच योगेश वडघुले, ग्रामसेविका शीतल झाडगे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गणेश खुटवड, ग्रामपंचायत सदस्य विजय शिर्के, शाळेतील उपशिक्षक देवीदास दिवटे, गीता नवले, ज्योती लाळगे, आसिफ इनामदार, अंकुश भांडवलकर, विलास कुंभार, अप्पा ठाकर, चंद्रकांत वडघुले, संतोष गरदरे तसेच गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : टाकळी भीमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल वाटप करताना सरपंच रूपाली गरदरे व ग्रामस्थ.
14052016-िं४ल्लि-20