‘कोजिमाशि’च्या लौकिकासाठी प्रयत्न
By Admin | Updated: April 27, 2015 00:19 IST2015-04-26T23:59:02+5:302015-04-27T00:19:00+5:30
बाळ डेळेकर : मुरगूडमध्ये पार पडला सत्कार सोहळा; महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था

‘कोजिमाशि’च्या लौकिकासाठी प्रयत्न
मुरगूड : महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणून कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संस्थेकडे पाहिले जाते. पारदर्शक कारभार, सभासदांच्या हिताचे निर्णय, यामुळे सहकारातील दिशादर्शक ठरलेल्या या संस्थेमध्ये सभासदांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेऊन ‘कोजिमाशि’चा नावलौकिक वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे अभिवचन संस्थेचे माजी अध्यक्ष व नवनिर्वाचित संचालक लक्ष्मण ऊर्फ बाळ डेळेकर यांनी दिले.मुरगूड (ता. कागल) या जन्मगावी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुरगूड विद्यालयामध्ये आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रशालाचे प्राचार्य पी. व्ही. शिंदे होते. यावेळी जन्मगावी झालेल्या यथोचित सत्काराने डेळेकर भारावून गेले. यावेळी उपमुख्याध्यापक जे. डी. पाटील, पर्यवेक्षक एस. आर. पाटील, उपप्राचार्य बी. एन. घोरपडे, पी. एस. पाटील, एन. टी. पाटील, डी. एस. कुंभार, आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य पी. व्ही. शिंदे, वडगाव विद्यालयातील प्रा. पी. एस. पाटील, समीर कटके, आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पी. बी. लोकरे, शाम पाटील, संजय सूर्यवंशी, शिक्षक प्रतिनिधी सुनील बोरवडेकर, एल. आर. सुदर्शनी, एस. जी. चांदेकर, अनिल भोई, एम. बी. टेपुगडे, यशोदा देशमुख, श्रीकांत कुंभार, आर. जी. पाटील, एस. बी. नायकवडी, कार्यालयीन प्रमुख आय. सी. पाटील, प्रा. विराजित घोरपडे, आदी उपस्थित होते. एस. आर. पाटील यांनी आभार मानले. ए. एन. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.