जास्तीत जास्त निराधारांना याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न : आमदार राजूबाबा आवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST2021-08-21T04:28:37+5:302021-08-21T04:28:37+5:30
येथे संजय गांधी निराधार अनुदान व श्रावण बाळ पेन्शन निराधार लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात आवळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ...

जास्तीत जास्त निराधारांना याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न : आमदार राजूबाबा आवळे
येथे संजय गांधी निराधार अनुदान व श्रावण बाळ पेन्शन निराधार लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात आवळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते. यावेळी वडगाव मंडल कार्यालयातील गावातील १५० लाभार्थीना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप केले. योजनेचे वितरण आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते झाले.
बाजीराव सातपुते, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील यांची भाषणे झाली. यावेळी उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, भगवान जाधव, संजय गांधी निराधारचे सदस्य सचिन चव्हाण, सुनील हुक्केरी, शिवाजीराव भोसले, कपिल पाटील, महिपती दबडे, मंडल अधिकारी गणेश बर्गे, रणजित निकम, रामभाऊ लोकरे, अर्चना बाबर, नगरसेवक सुनीता पोळ, संगीता मिरजकर, अनिता चव्हाण उपस्थित होते.
0000
फोटो ओळी : पेठवडगाव येथे संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप करताना आमदार राजूबाबा आवळे. सोबत नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, सचिन चव्हाण, सुनील हुक्केरी आदी उपस्थित होते.