पदाचा वापर विकासकामाबरोबर पक्षवाढीसाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:18 IST2021-07-20T04:18:47+5:302021-07-20T04:18:47+5:30

आ. आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यातील सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांला तालुक्यातील विविध विकासकामे करण्यासाठी जिल्हा पातळीवरील मोठी पदे देऊन त्यांचा सन्मान ...

Try to use the term for party growth along with development work | पदाचा वापर विकासकामाबरोबर पक्षवाढीसाठी प्रयत्न करा

पदाचा वापर विकासकामाबरोबर पक्षवाढीसाठी प्रयत्न करा

आ. आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यातील सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांला तालुक्यातील विविध विकासकामे करण्यासाठी जिल्हा पातळीवरील मोठी पदे देऊन त्यांचा सन्मान केला आहे. त्या पदाचा वापर विकासकामे करून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण जाधव यांनी आवाहन केले.

या तालुक्यात जिल्हा दूध संघ (गोकुळ) संचालक, मार्केट कमिटी प्रशासकीय सदस्य, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती, संजय गांधी राष्ट्रीय निराधार योजना तालुका अध्यक्ष, पणन महासंघ सदस्य, रोजगार हमी जिल्हा सदस्य, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य, पंचायत समिती सभापती अशी मोठी पदे या तालुक्याच्या विकासासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्या माध्यमातून पक्षवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी आ. आबिटकर यांनी म्हटले आहे.

आ. आबिटकर यांनी विविध विकासकामे करण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जिल्हा पातळीवरील मोठी पदे देऊन त्यांचा सन्मान केल्याबद्दल आ. आबिटकर यांचा सत्कार शामराव भावके यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: Try to use the term for party growth along with development work