जनतेचा विश्वास हीच कामाची पोचपावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST2021-01-08T05:18:27+5:302021-01-08T05:18:27+5:30

हातकणंगले : आळते (ता. हातकणंगले) येथील जनतेने मतदानातून माझ्यावर दाखवलेला विश्वास हीच माझ्या कामाची पोचपावती आहे, असे प्रतिपादन आमदार ...

The trust of the people is the acknowledgment of the work | जनतेचा विश्वास हीच कामाची पोचपावती

जनतेचा विश्वास हीच कामाची पोचपावती

हातकणंगले :

आळते (ता. हातकणंगले) येथील जनतेने मतदानातून माझ्यावर दाखवलेला विश्वास हीच माझ्या कामाची पोचपावती आहे, असे प्रतिपादन आमदार राजू आवळे यांनी केले. आळते येथे धुळोबा देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आळते येथील धुळोबा देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी गेली ३० ते ४० वर्षे पाठपुरावा करूनही रस्त्याचे काम झाले नाही. पावसाळ्यात शेतकऱ्यांची दमछाक होत होती. आमदार राजूबाबा आवळे यांच्या प्रयत्नांतून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमप्रसंगी आमदार राजूबाबा आवळे यांनी आळते येथे विकासकामे सुचवा तेथे फंड खेचून आणू आणि गावाचा विकास करू, असे अभिवचन दिले.

यावेळी पंचायत समिती सदस्य प्रवीण जनगोंडा, बाळगोंड पाटील, शकील अत्तार, गुलाब मुल्ला, सुकुमार कोठावळे, जयसिंग कांबळे, मोहन कोळेकर, धनपाल कनवाडे, भीमराव सुतार, आप्पासाहेब मगदूम, आप्पासोा पाटील, मा. उपसरपंच महावीर मजलेकर उपस्थित होते.

०४ आळते रोड वर्क

फोटो ओळ - आळते येथील रस्त्याच्या खडीकरण कामाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार राजूबाबा आवळे, शकील अत्तार, बाळगोंडा पाटील, सुकुमार कोठावळे इत्यादी उपस्थित होते.

Web Title: The trust of the people is the acknowledgment of the work