तृप्ती माळवी कोल्हापूरच्या नूतन महापौर
By Admin | Updated: August 9, 2014 00:30 IST2014-08-08T23:33:25+5:302014-08-09T00:30:13+5:30
‘महापौर दरबार’ ही अभिनव संकल्पना सुरू करू,

तृप्ती माळवी कोल्हापूरच्या नूतन महापौर
कोल्हापूर : कोल्हापूरच्या ४१व्या महापौरपदी आज, शुक्रवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तृप्ती माळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महापालिकेच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी निवडीची घोषणा केली. शहराचा टोल प्रश्न, पंचगंगा व रंकाळा प्रदूषण हे विषय अग्रक्रमावर असतील. ‘महापौर दरबार’ ही अभिनव संकल्पना सुरू करू, असे आश्वासन निवडीनंतर नूतन महापौरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले. सुनीता राऊत यांनी २८ जुलैला महापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीतर्फे तृप्ती माळवी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. आज झालेल्या विशेष सभेत महापौर निवडीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली.