उद्योजक तेज घाटगे, राहुल देसाई यांच्याकडून गारगोटी स्मशानभूमीस एक ट्रक लाकूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:25 IST2021-05-27T04:25:30+5:302021-05-27T04:25:30+5:30

गारगोटी : उद्योजक तेज घाटगे आणि राहुल देसाई यांनी गारगोटीतील सचिन देसाई, रत्नाकर देसाई यांच्या सहकार्यातून गारगोटी स्मशानभूमीला एक ...

A truckload of wood at Gargoti Cemetery by businessman Tej Ghatge, Rahul Desai | उद्योजक तेज घाटगे, राहुल देसाई यांच्याकडून गारगोटी स्मशानभूमीस एक ट्रक लाकूड

उद्योजक तेज घाटगे, राहुल देसाई यांच्याकडून गारगोटी स्मशानभूमीस एक ट्रक लाकूड

गारगोटी : उद्योजक तेज घाटगे आणि राहुल देसाई यांनी गारगोटीतील सचिन देसाई, रत्नाकर देसाई यांच्या सहकार्यातून गारगोटी स्मशानभूमीला एक ट्रक लाकूड मोफत दिले. त्यांचा सत्कार गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे यांनी शाल, श्रीफळ देऊन केला.

गारगोटी कोविड सेंटरला भुदरगड तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. अशा कठीण परिस्थितीत सुरू असलेले लॉकडाऊन हा फार गांभीर्याचा विषय आहे. मयतांची संख्याही ४० हजार पार करून गेल्याने लाकूड, शेणी, आदींचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत तेज घाटगे, राहुल आणि सचिन, रत्नाकर देसाई यांनी केलेली लाकडाच्या स्वरूपातील मदत मोलाची असल्याचे भाजपचे गारगोटी शहर अध्यक्ष प्रकाश वास्कर यांनी सांगितले. यावेळी माजी उपसरपंच जयवंत गोरे, विनायक शिंदे, राहुल कांबळे, कुंडलिक कांबळे, सचिन गुंड, आदी उपस्थित होते. बजरंग कुरळे यांनी आभार मानले.

फोटो (२६०५२०२१-कोल-तेज घाटगे न्यूज) : उद्योजक तेज घाटगे आणि राहूल देसाई यांनी गारगोटीतील सचिन देसाई, रत्नाकर देसाई यांच्या सहकार्यातून गारगोटी स्मशानभूमीला एक ट्रक लाकूड मोफत दिले.

Web Title: A truckload of wood at Gargoti Cemetery by businessman Tej Ghatge, Rahul Desai