शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटल्याने भुईबावडा घाटात ट्रक उलटला, चालक-क्लिनर जखमी; वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 16:49 IST

दरम्यान, घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे

गगनबावडा : टायर फुटल्याने मैद्याची पोती घेऊन जाणारा ट्रक भुईबावडा घाटात उलटला. या अपघातात चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत. चालक सचिन दशरथ शिरसाट व क्लिनर विकास अशोक रंगचोरे अशी या दोघा जखमींची नावे आहेत. दुपारच्या सुमारास हा अपघात  झाला. दरम्यान, घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.याबाबत माहिती अशी की, चालक सचिन शिरसाट हे मैद्याने भरलेला ट्रक ( नं.एमएच-१५-ईजी-७८३९) सिन्नरहून गोव्याकडे घेऊन जात होते. त्यांच्यासोबत क्लिनर विकास रंगचोरे होते. भुईबावाडा घाटात ट्रक आला असता ट्रकचा पुढील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला आणि ट्रक रस्त्यातच पलटी झाला.या अपघातात मैद्याच्या पिशव्या खोल दरीत गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच ट्रकचेही मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पो. ना. आर.व्ही. नारणवर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड, जायभाय हे घटनास्थळी दाखल झाले. टायर फुटून हा अपघात झाल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात