कऱ्हाडजवळ ट्रकची कारला धडक; दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:53 IST2020-12-05T04:53:58+5:302020-12-05T04:53:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर (जि. सातारा) : पुणे-बंगलोेर राष्ट्रीय महामार्गावर जखीणवाडी गावच्या हद्दीत कारला समोरून डाव्या बाजूने आलेल्या ट्रकने ...

Truck hit car near Karhad; Both killed | कऱ्हाडजवळ ट्रकची कारला धडक; दोघे ठार

कऱ्हाडजवळ ट्रकची कारला धडक; दोघे ठार

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर (जि. सातारा) : पुणे-बंगलोेर राष्ट्रीय महामार्गावर जखीणवाडी गावच्या हद्दीत कारला समोरून डाव्या बाजूने आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले असून, अन्य तीनजण जखमी झाले आहेत. गुरुवारी पहाटे ही दुर्घटना घडली.

श्रीहरी तुकाराम वाघमारे (वय ४८, रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे), बापूसाहेब खंडेराव कांबळे (५०, रा. काळेवाडी, पिंपरी, पुणे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत, तर अश्‍विनी श्रीहरी वाघमारे (४५), रागिणी श्रीहरी वाघमारे (२१, रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे), चालक फुलचंद नवनाथ चतूर (३९, रा. गंगानगर फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) अशी जखमींची नावे आहेत.

पुणेतील फुलचंद चतूर हे बुधवारी रात्री त्यांचे नातेवाईक श्रीहरी वाघमारे, बापूसाहेब कांबळे, अश्‍विनी वाघमारे, रागिणी वाघमारे यांना घेऊन कारमधून (एमएच १२ एसक्यू ११९५) पुणेहून बेळगाव येथे औषध आणण्यासाठी निघाले होते. जखीणवाडी गावच्या हद्दीत मळाईदेवी पतसंस्थेसमोरील चौकात कारच्या समोरून डाव्या बाजूने आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये श्रीहरी वाघमारे व बापूसाहेब कांबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी ते मृत झाल्याचे सांगण्यात आले, तर अश्‍विनी वाघमारे, रागिणी वाघमारे व चालक फुलचंद चतूर हे किरकोळ जखमी झाले. अपघात होताच घटनास्थळावरून ट्रकचालकाने ट्रकसह पोबारा केला.

Web Title: Truck hit car near Karhad; Both killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.