ट्रकचालकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:19 IST2020-12-07T04:19:45+5:302020-12-07T04:19:45+5:30
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, ओंकार याचे मूळ गाव वारणा कोडोली (ता. पन्हाळा) हे आहे. वडील ...

ट्रकचालकाची आत्महत्या
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, ओंकार याचे मूळ गाव वारणा कोडोली (ता. पन्हाळा) हे आहे. वडील मृत झाल्यामुळे आई, दोन बहिणींसह तो मामांकडे मालेवाडी येथे राहत होता. तो गेल्या एक महिन्यापासून जाधव यांच्या मालवाहतूक ट्रकवर तात्पुरते ड्रायव्हरचे काम करीत होता. शनिवारी तो शिरोली एमआयडीसीत आला व गाडीला लोड नसल्यामुळे एमआयडीसी भागातच ट्रक थांबवून राहिला होता. दरम्यान, रविवारी रात्री त्याने पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या एका झाडास दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. त्यात त्याने आत्महत्येचे कारण लिहिले आहे. ह्या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले व फौजदार अतुल लोखंडे तपास करीत आहेत.
.