शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

तिलारी घाटात ट्रक कोसळला, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामातील दिरंगाईचा परिणाम; अधिकारी धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 17:17 IST

अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला असता ते निरुत्तर झाले

चंदगड : धोकादायक तिलारी घाटातील संरक्षक भिंतीचे काम लवकर सुरू करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याने दिले होते. मात्र ते आश्वासन पूर्ण करण्याआधीच बुधवारी (दि. १०) रात्री पुन्हा एकदा घाटातील अवजड वळणावर तामिळनाडूमधील एक ट्रक पलटी झाल्याने या प्रश्नाचे सार्वजनिक बांधकाम विभागाला गांभीर्य नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. ॲड. संतोष मळवीकर यांनी याबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला असता ते निरुत्तर झाले.तिलारी घाटातील संरक्षक भिंती जीर्ण झाल्या असून अनेक ठिकाणी त्या गायब झाल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणावरून अनेक वाहने घाटात कोसळून जीवित व वित्तहानी झाली आहे. याबाबत मळवीकर यांनी गेल्याच आठवड्यात सार्वजनिक बांधकाम व वनविभागाची बैठक घेतली. दोन दिवसात २ कोटी ७ लाखांच्या संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता राजेंद्र सावंत यांनी दिले होते.

मात्र हे आश्वासन पाळण्यापूर्वीच आणखी एक ट्रक कोसळल्यामुळे संतापलेल्या मळवीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यड्रावकर यांना संरक्षक भिंतीच्या कामाचे काय झाले, असे विचारत धारेवर धरले. मात्र त्यांच्याकडे याबाबत खुलासा नसल्याने ते निरुत्तर झाले.यावेळी संभाजी मळवीकर, परशराम पवार, अनिल गावडे, श्रीकांत गावडे, गोविंद गावडे, संतोष सुतार व हणमंत पाटील उपस्थित होते.डोळे उघडणार? सार्वजनिक बांधकाम विभागाला या धोकादायक तिलारी घाटाचे गांभीर्य नसल्याने मोठी घटना घडल्यावरच या खात्याचे डोळे उघडणार काय ? असा सवाल मळवीकर यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात